Sunburn Festival Petition Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: ‘सनबर्न’ची सुनावणी 11 फेब्रुवारीपर्यंत तहकूब; याचिकादारांनी मागितला वेळ

Sunburn Festival Petition: धारगळ येथे गेल्या डिसेंबरच्या अखेरीस झालेल्या सनबर्न ईडीएम फेस्टीव्हलसंदर्भात असलेल्या गाऱ्हाणी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रकाद्वारे मांडण्यासाठी याचिकादारांनी वेळ मागितल्याने सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Sameer Panditrao

पणजी: धारगळ येथे गेल्या डिसेंबरच्या अखेरीस झालेल्या सनबर्न ईडीएम फेस्टीव्हलसंदर्भात असलेल्या गाऱ्हाणी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रकाद्वारे मांडण्यासाठी याचिकादारांनी वेळ मागितल्याने त्यावरील सुनावणी येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

या फेस्टीव्हलच्या आयोजनासंदर्भात गोवा खंडपीठाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली होती त्यातील काहींची अंमलबजावणी करण्यात आयोजक अपयशी ठरले आहेत. त्यासंदर्भातची माहिती अतिरिक्त प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यात येईल, अशी माहिती दोन्ही याचिकादारांनी न्यायालयाला दिली.

या सुनावणीवेळी सनबर्न ईडीएम फेस्टीव्हलच्या पहिल्याच दिवशी ड्रग्जचा बळी ठरलेल्याची माहिती देण्याचा प्रयत्न याचिकादारांनी न्यायालयात यावेळी केला, मात्र खंडपीठाने त्यामध्ये हस्तक्षेप करत त्यांची जी काही गाऱ्हाणी आहेत त्याची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्या असे यावेळी सांगितले.

या फेस्टीव्हलच्या दरम्यान वाहतूक तसेच सुरक्षा व ध्वनी प्रदूषण यासंदर्भातचा कोणताही अहवाल मागितला नाही. मात्र याचिकादारांनी गाऱ्हाणी सादर केल्यानंतर त्याला सरकार उत्तर देण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी ११ फेब्रुवारीला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT