Usgaon- Tisk Accident Dainik Gomantak
गोवा

मित्राला पोचवण्यासाठी गेला अन् परतलाच नाही; उसगांव तिस्क येथे अपघातात दुचाकीस्वार ठार

Usgaon- Tisk Accident Case: गोव्यात अपघाताच्या घटना सुरुच असून, आज झालेल्या अपघातात एक ठार, दोघे जखमी झाले.

Pramod Yadav

उसगांव तिस्क येथे अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर लहान मुलगा जखमी झाला. जखमी लहान मुलावर पिळये आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार उसगाव कसल्ले या गावातून उसगाव बाजारात आपल्या धर्मेंद्र या मित्राला पोचवण्यासाठी जात असता समोरून येणाऱ्या खडीची वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक दुचाकीला बसली व चालकासह दुचाकी रस्त्यावर आडवी झाली.

या घटनेत दुचाकी चालक सुभेलाल याच्या डोक्यावरून ट्रकचे पाठीमागील चाक गेल्याने त्याचे जागीच ठार झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मुलगा साईश व सुभेलालचा मित्र धर्मेंद्र हाही जखमी झाला.

धर्मेंद्र याच्यावर उपचार करून घरी पाठविले तर सुभेलालचा मुलगा साईश पिळये तिस्क येथील इस्पितळामध्ये उपचार घेत आहे. फोंडा पोलिसांनी पंचनामा करून मृत सुभेलालचा मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव येथे पाठवलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्र ग्रह प्रसन्न होणार! 'या' 5 राशींना मोठ्या लाभाचे संकेत; काय होणार महत्वाचे बदल? वाचा..

अग्रलेख: ‘आमी पणजेकार’ चा धुव्वा उडवणारे ‘प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनेल; जनसंपर्क यशाचे ‘इंगित’,

'गॅस नाही, ढकला लग्न पुढे'! सिलेंडरटंचाईचा भलताच परिणाम; केटरर्स मिळत नसल्याने विवाहसोहळ्यांना फटका

Mulgao: मुळगाव खाणप्रश्नी तिढा सुटणार! मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक, सकारात्मक तोडग्याचे आश्वासन

Black Panther: ब्लॅक पँथरसोबत आढळले 2 बछडेही! करसंगे परिसरात नागरिकांना दर्शन; स्थानिकांमध्ये उत्सुकता आणि भीती

SCROLL FOR NEXT