Pernem Mobile Theft Dainik Gomantak
गोवा

Pernem News: मोबाईल चोरीप्रकरणी सावंतवाडीतील पाच युवकांना अटक; पेडणे पोलिसांची कारवाई

पावणेपाच लाखांच्या 21 मोबाईलची चोरी

दैनिक गोमन्तक

Pernem Mobile Theft: मालपे येथील क्रिएटीविटी, बेस्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या फ्लिपकार्ट शाखेच्या गोदामातून वेगवेगळ्या कंपनीचे ४,८१,२१५ रुपये किमतीच्या २१ मोबाईलच्या चोरीप्रकरणी पेडणे पोलिसांनी मंगळवारी याच दुकानांत कामाला असलेल्या पाच संशयितांना अटक करून त्यांच्याकडील १४ मोबाईल जप्त केले आहे.

तर उर्वरित ७ मोबाईलचा शोध सुरू आहे. सर्व संशयित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. हे मोबाईल लोकांनी फ्लिपकार्टवर मागवले होते.

चोरीला गेलेल्या २१ मोबाईल फोनपैकी पोलिसांनी ३,१०,००० रुपये किमतीचे १४ मोबाईल फोन संशयितांकडून ताब्यात घेतले आहेत, तर ७ मोबाईल अद्याप मिळालेले नाहीत.

सातार्डा - सावंतवाडी येथील कृष्णा ज्ञानेश्वर गोवेकर हे मालपे येथे क्रिएटीविटी, बेस्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या फ्लिपकार्टच्या दुकानात साहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम पाहतात.

३ जुलै ते २९ ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्या आस्थापनात ही चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पेडणे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

त्यानुसार पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर, तीर्थराज म्हामल, प्रेमनाथ सावळ देसाई, येसुदास उगवेकर, सचिन हळर्णकर, योगेश गावकर यांनी चौकशी करून ही कारवाई केली.

पेडणे पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार व पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेले संशयित

अटक केलेल्या संशयितांमध्ये विराज वसंत वेंगुर्लेकर (वय २२, सातार्डा), श्रीधर अनिल राऊळ (वय २२, कवठण - सावंतवाडी), वैभव अनिल सातार्डेकर (वय २४, आरवली, वेंगुर्ला - शिरोडा), हर्षल ज्ञानेश्वर गोवेकर (वय २२, सातार्डा), गौरव चित्रसेन (वय २२, कवठण - सावंतवाडी) यांचा समावेश आहे.

नागरिकांत संताप

वारंवार घडत असलेल्या चारीच्या प्रकारणांमुळे नागरिकांत संताप व भीती व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

धक्कादायक! शेवपुरी खाणं बेतलं जीवावर, दोडामार्गच्या 35 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

Child Health Tips: पालकांनो, दुर्लक्ष नका करु! मुलांच्या आरोग्यासाठी वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी का करावी? योग्य पातळी किती असावी? जाणून घ्या

Ravichandran Ashwin BBL: रविचंद्रन अश्विन 'बिग बॅश लीग'मध्ये खेळणार, 'या' संघाकडून मैदानात उतरणार; 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय

Salman Khan: बॉलिवूडचा सल्लूभाई म्हणतो, 'एक दिवस मलाही मुलं होतील'

SCROLL FOR NEXT