MLA Rohan Khaunte: माहिती-तंत्रज्ञानात यशाची कवाडे, खंवटे यांच्या हस्ते माहिती-तंत्रज्ञान शिक्षकांचा सत्कार

खंवटे : शिक्षकांचा सत्कार; विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणात योगदान
MLA Rohan Khaunte:
MLA Rohan Khaunte: Dainik Gomantak

Rohan Khaunte: 'देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे भविष्य आमच्या समर्पित शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या हातात आहे. या अतूट बांधिलकी आणि उत्कटतेतून, मनाला आकार मिळेल आणि व्यावसायिक तयार होतील,’ असे मत माहिती-तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी (ता.५) येथे व्यक्त केले. खंवटे यांच्या हस्ते माहिती-तंत्रज्ञान शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

MLA Rohan Khaunte:
Goa Garbage Issue: कचरावाहू ट्रकांतील घाण पाणी रस्त्यावर

यावेळी माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि जनसंपर्क विभागाचे संचालक सुनील अन्चीपका, कामगार आणि रोजगार विभागाचे आयुक्त आग्नेल फर्नांडिस आणि गोवा स्टार्टअप आणि आयटी प्रोत्साहन विभागाचे सीईओ डी.एस. प्रशांत उपस्थित होते.

सत्कार झालेल्यांमध्ये अभियांत्रिकी संस्थांमधील डॉ. नीलेश फळदेसाई (गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ. गौरांग पाटकर (डॉन बॉस्को अभियांत्रिकी माविद्यालय फातोर्डा), मंजूषा संके (श्री रायरेश्वर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था शिरोडा), स्नेहल भोगन (आग्नेल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था आसगाव) यांचा समावेश होता.

टेक-फॉर-गोवा फेलो म्हणून सस्मीत नाडकर्णी, सिद्धी पारोडकर, राज्यातील सरकारी/अनुदानित शाळांमधील संगणक शिक्षक समिता नाईक (सेंट एलिझाबेथ उच्च माध्यमिक शाळा बार्देश), कॅजिटन क्रॅस्टो (सेंट तेरेझा कॉन्व्हेंट माध्यमिक शाळा राय) आणि इतरांचा समावेश होता.

MLA Rohan Khaunte:
Manoj Parab: म्हापसा ‘टीसीपी’वर नेणार मोर्चा

याव्यतिरिक्त, एड-टेक क्षेत्रात गोव्यातील स्टार्टअप गटात सुवर्णा सुर्लेकर (फनमाइंड्स लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड) आणि दामोदर पाटकर (बोधामी प्रायव्हेट लिमिटेड) यांचा समावेश होता.

आठवणींना उजाळा

खंवटे यांनी माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या भविष्याला आकार देण्यासाठी शिक्षक आणि प्रशिक्षकांचे महत्त्व प्रतिबिंबित केले. त्यांनी त्यांच्या जुन्या काळातील शिक्षकांची आठवण करून दिली ज्यांनी त्यांचे जीवन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणात शिक्षकांचे अमूल्य योगदान ओळखणे आणि त्यांचा उत्सव साजरा करणे हा सन्मान आहे. आपण एकत्रितपणे माहिती तंत्रज्ञान शिक्षणात उत्कृष्टता वाढवणे आणि गोव्याच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देऊया.

- रोहन खंवटे, माहिती-तंत्रज्ञानमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com