Goa Crime News: विहिरीत सापडले मानवी अवशेष; दीड वर्षापूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता

Goa Crime News: अवशेष पुरुषाचे की स्त्रीचे हे समजू शकलेले नाही
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Found Human Remains In Aldona: सडोवाडो-हळदोणा येथे पोर्तुगीजकालीन घराच्या आवारातील विहिरीत मानवी अवशेष सापडल्याने खळबळ उडाली.

या विहिरीत दोन हाडे व कवटी सापडली असून, ते पुरुषाचे की स्त्रीचे हे समजू शकलेले नाही. म्हापसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अवशेष उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवले आहेत.

Crime News
Goa Politician Scandal: मंत्र्याची बदनामी; 10 दिवसांनंतरही तपास शून्य

या घराचे मालक सावियो फर्नांडिस हे मुंबईत वास्तव्याला आहेत. घरात त्यांची नातेवाईक असलेली ८० वर्षीय वृद्धा एकटीच राहते.

घरमालक फर्नांडिस यांनी कंत्राटदारामार्फत या विहिरीची साफसफाई तसेच डागडुजीचे काम दिले होते.

त्यानुसार, चार-पाच कामगार सोमवारी सायंकाळी विहीर उपसण्याचे काम करत असताना त्यांना विहिरीत मानवी अवशेष दिसले.

त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ म्हापसा पोलिसांनी दिली. पोलिसांनी विहिरीतून दोन हाडे व कवटी बाहेर काढली.

Crime News
Drunk and Drive:14 लाख वाहने, अल्कोमीटर केवळ 84; मद्यपी वाहनचालकांना पकडणार कसे?

मृत्यू दीड वर्षापूर्वी

ही विहीर 30 ते 40 मीटर खोल असून, या विहिरीचे पाणी घरातील सदस्य वापरायचे. या विहिरीत मानवी अवशेष कसे आले, याचा तपास पोलिस करत आहेत.

विहिरीत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू दीड ते दोन वर्षांपूर्वी झाला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. म्हापसा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com