Pernem News Dainik Gomantak
गोवा

Pernem News: पेडणेवासींयाचा वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटेना; बेशिस्त पार्किंग ठरतंय डोकेदुखी

बेशिस्त पार्किंग : खोदलेले रस्ते, रस्त्यावरील बांधकाम साहित्याचा परिणाम

गोमन्तक डिजिटल टीम

Morji : पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 आणि गावातील अंतर्गत रस्ते हे धोकादायक स्थितीत आहेत. अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्यामागची अनेक कारणे आहेत. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते पावसाळा सुरू झाला, तरी व्यवस्थित केले गेले नाही. शिवाय बांधकाम साहित्य बांधकामे होऊनही रस्त्यावर पडलेली आहेत. अनेक ठिकाणी बेशिस्त वाहने उभी केली जातात. यामुळे पेडणे, मांद्रे, मोरजी व किनारपट्टीतील रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते.

ट्रॅफिक पोलिस वाहने तपासण्याच्या नावावर नाक्या नाक्यावर उभे राहून वाहतुकीच्या कोंडी बरोबरच अपघातालाही कारणीभूत ठरत आहेत. ‘नो एन्ट्री’ मधूनही काही वाहने प्रवेश करत असल्याने कधीकधी अचानक वाहतुकीची कोंडी होते. अपघात घडल्यानंतर वाहतुकीची कोंडी होतेच. परंतु त्या घटनास्थळी वेळीच ट्रॉफिक पोलीस वाहतूक अधिकारी पोहोचत नसल्याने सर्वसामान्य वाहन चालकांना मात्र रस्त्यावर तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागते.

राष्ट्रीय महामार्ग ६६ चे बांधकाम व आराखडा यामध्ये खूप गलथानपणा आहे. जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च करून जनतेलाच हवा, तो दर्जा संभाळण्यास कंत्राटदार, सरकार दोघेही अपयशी ठरले आहेत. धारगळ येथील दोन खांब जंक्शन, मालपे जंक्शन पोरस्कडे जंक्शन जवळ खचलेला रस्ता करासवाडा जंक्शनवर भयानक स्थिती आहे. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी अपघात होतात. गाड्यांचा वेग वाढला, की गाड्या हेलकावे खातात व अपघात होतो.

केवळ महामार्ग, रस्ते रुंद आणि गुळगुळीत करून वाहतूक समस्या सुटत नाहीत. रस्त्यांचे व्यवस्थापन व्यवस्थित केले आणि वाहतुकीत शिस्त आणली तर बऱ्याच समस्या सुटतील. रस्ते तयार करताना पुढील पन्नास वर्षे नजरेसमोर ठेवून वीज, जलवाहिनी, गटार यासाठीची व्यवस्था करायला हवी. अपघातप्रवण क्षेत्रे, वळणे कमी करावीत. अवजड मालवाहू वाहनांवर गती मर्यादा ठेवावी, अशी मागणी मांद्रे गट काँग्रेस अध्यक्ष नारायण रेडकर यांनी केली.

सूचना फलकांचा अभाव

रस्त्यावर सूचना फलकांचा अभाव सर्व ठिकाणी दिसतो. ज्यामुळे जास्त करून राज्याबाहेरील वाहने व पर्यटकांच्या गाड्यांना जास्त अपघात होतात. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीय महामार्गवर असलेले क्रॉसिंग त्वरित बंद करुन लोकांना जवळपास असलेल्या उड्डाण पुला खालचा रस्ता उपयोगात आणणे, सक्तीचे करावे. या ठिकाणी वाहतूक पोलिस ठेवावा. मोपा विमानतळ ते मडगाव, कलंगुट इत्यादी ठिकाणी प्रवास करणाऱ्या कादंबाच्या मोठ्या बशी बंद कराव्यात, कारण त्यामध्ये 4 ते 5 प्रवासी असतात, पण बस मोठी असल्याने वाहतुकीवर परिणाम होतो,अशी माहिती समाजकार्यकर्ते भारत बागकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

Goa Opinion: गोव्याचा दुसरा मुक्तिलढा जमीन माफियांविरुद्धचा असेल..

2 दिवसांच्या कामासाठी दिले 500 रुपये मानधन! बालरथ चालकांचा ठिय्या; तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त Watch Video

Vijay Hazare Trophy: शुभमची संघात वापसी, कर्णधारपदाची धुरा दीपराजच्या खांद्यावर; एकदिवसीय स्पर्धेसाठी गोव्याचा संघ जाहीर

गोव्यासाठी विमान प्रवास महागला! नाताळच्या काळात तिकीट दरात मोठी वाढ; जयपूरहून येणाऱ्या पर्यटकांना बसतोय सर्वाधिक फटका

SCROLL FOR NEXT