Pernem Dainik Gomantak
गोवा

Pernem: पेडणे सामुदायिक आरोग्य केंद्रात 59 पदे रिक्त; कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांचे हाल: म्हापसा जिल्हा रुग्णालय, 'गोमेकॉ'वर भिस्त

Pernem CHC medical services affected: पेडणे येथील सामुदायिक आरोग्य केंद्र (सीएचसी) येथे ५९ पदे मंजूर असूनही ती रिक्त आहेत. त्यामुळे अत्यावश्यक वैद्यकीय सेवांवर परिणाम होत आहे.

Sameer Amunekar

पेडणे: पेडणे येथील सामुदायिक आरोग्य केंद्र (सीएचसी) येथे ५९ पदे मंजूर असूनही ती रिक्त आहेत. त्यामुळे अत्यावश्यक वैद्यकीय सेवांवर परिणाम होत आहे. तपासणीसाठी रुग्णांना म्हापसा जिल्हा रुग्णालय किंवा गोमेकॉत जावे लागत असून पेडणे तालुक्यातील रुग्णांचे हाल होत आहेत.

नुकत्याच संपलेल्या विधानसभा सत्रात ‘आप’ वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्य सरकारने दिलेल्या उत्तरानुसार, पेडणे सामुदायिक आरोग्य केंद्रात रिक्त पदांमध्ये एक वरिष्ठ सर्जन, दोन कनिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ, एक कनिष्ठ भूलतज्ज्ञ, कनिष्ठ फिजिशियन, कनिष्ठ सर्जन, कनिष्ठ बालरोग तज्ज्ञ, चार वैद्यकीय अधिकारी, होमिओपॅथिक फिजिशियन, आहारतज्ज्ञ, नऊ स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्निशियन, एस्थेटिक टेक्निशियन, कंपाउंडर/फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इन व्हेस्टिगेटर, पाच एमपीएचडब्ल्यू (महिला), दोन एमपीएचडब्ल्यू (पुरुष), मुख्य क्लर्क, एलडीसी, स्वयंपाकी,ड्रायव्हर, गोवा साथी आणि १७ मदतनीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

काही स्थानिकांनी सांगितले की, यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून कार्यरत असताना या इस्पितळात शस्त्रक्रिया आणि प्रसूती केल्या जात होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे स्त्रीरोग विभाग आणि बालरोग विभाग यासारख्या महत्त्वाच्या सुविधा अक्षरशः बंद पडल्या आहेत.

रिक्त पदांमुळे रुग्णांना उपचारांसाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय म्हापसा किंवा ‘गोमेकॉ’ बांबोळी येथे जावे लागते. तर गर्भवती महिलांना म्हापसा जिल्हा रुग्णालायात जावे लागते.

तुये हॉस्पिटल कृती समितीचे अध्यक्ष जुझे लोबो म्हणाले की,या इस्पितळात गेल्या बऱ्याच दिवसापासून अनेक डॉक्टर नसल्याने संपूर्ण तालुक्यातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सरकारने मंजूर केलेल्या सुविधा पुरवणे ही आरोग्य सेवा संचालनालयाची जबाबदारी आहे. ही त्यांनी पार पाडावी.

पेडणे तालुक्यातील तमाम जनता गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या इस्पितळासाठी ही इमारत बांधून आठ वर्षे झाली. उलट सामुदायिक इस्पितळातही असलेल्या वैद्यकीय सेवा बंद करत आहे. आरोग्य खात्याने बंद असलेल्या वैद्यकीय सेवा त्वरित सुरू करणे आवश्यक आहे.

-सुदीप कोरगावकर, सरपंच कोरगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT