TMC Press Conference  Dainik Gomantak
गोवा

'तृणमूल कोंग्रेसच्या योजनांचा गोमंतकीयांना फायदा होणार'

असे तृणमूल कॉंग्रेस नेते यशवंत सिन्हा म्हणाले. तृणमूल कोंग्रेसने (TMC) गोव्यात तीन योजना जाहीर केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी तृणमुल कॉंग्रेस गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आज (सोमवारी) तृणमूल कॉंग्रेस नेते यशवंत सिन्हा यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेतली. या वेळेस त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. (Yashwant Sinha TMC Goa Assembly Election)

तृणमूल कोंग्रेसने (TMC) गोव्यात तीन योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये माझे घर, मालकी हक्क, गृहलक्ष्मी आधार योजना (Grihalakshmi Aadhar Yojana) आणि युवा शक्ति कार्ड या योजनांचा समावेश आहे. याबद्दल बोलताना सिन्हा म्हणाले, "या योजनांचा गोव्यातील लोकांना फायदा होणार आहे. मतदारांनी यांच्या हाती गोव्याची सत्ता दिली तर आम्ही यशस्वीरित्या या योजना राबवू. या योजना राबवण्यासाठी 3330 कोटी इतका खर्च येणार आहे."

सिन्हा शेतीबद्दल बोलताना म्हणाले, गोव्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) आम्ही विविध योजना राबवणार आहोत. त्यांना शेतीसाठी आर्थिक व तांत्रिक मदत दिली जाईल. गोव्याला दुसऱ्या राज्यांकडून धान्य आणि भाजीपाला घ्यायची आवश्यकता नाही भासली पाहिजे. यासाठी पावले उचलली जातील.

गोव्यातील (Goa) युवकांना उद्योग धंदा करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. गोव्यात उद्योग करणे सोपे नाही आहे. 'Ease of doing business' मध्ये गोवा 2019 मध्ये चोविसाव्या स्थानावर होता. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे, असे देखील यशवंत सिन्हा म्हणाले.

पत्रकारांनी कसिनोबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. सिन्हा म्हणाले, प्रामाणिकपणे काम करत असलेले कसिनो सुरू ठेवयास हरकत नाही. पार्टी यावर विचार करेल. सिन्हा यांनी जनतेला विश्वास दिला की, गोव्यात तृणमूल कॉंग्रेसचे सरकार आल्यास ते स्वतः इथे येऊन योजना राबवतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT