पर्वरीत भाजप-रोहन खंवटेंची गळाभेट,पण मने दुभंगलेलीच!

माजी आमदार रोहन खंवटे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि पर्वरी भाजप (BJP) मंडळ पुरते ‘पंक्चर’ झाले.
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak
Published on
Updated on

पर्वरी: गोवा प्रदेश भाजपने ‘विजयी होणारा तो उमेदवार’ हा एकमेव निकष लावून राज्यभर दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करण्याचा जणू सपाटा लावला आहे.त्यामुळे या पक्षातील जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. भाजप मंडळ आणि आमदार रोहन खंवटे यांची पक्षाच्या धुरीणांनी गळाभेट घडवून आणली पण मने दुभंगलेलीच असल्याचे नाराज निष्ठावंतांच्या देहबोलीवरून स्पष्ट होत होते. (Goa Assembly Election 2022)

Rohan Khaunte
'काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही'

कितीतरी वर्षे कशाचीही आशा न बाळगता एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची यावेळी पक्षाने घोर निराशा केली आहे,असे जुने कार्यकर्ते उघडपणे बोलताना दिसत आहेत. काही ठिकाणी पक्षशिस्त म्हणून मुकामार सहन करून कार्यकर्ते गप्प राहिले आहेत.तर काही ठिकाणी कार्यकर्ते बंड करून उठले आहेत.तर काही ‘ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हातात ‘लॉलीपॉप’ देऊन त्यांना थंड केल्याची मतदारांत चर्चा आहे.

माजी आमदार रोहन खंवटे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि पर्वरी भाजप (BJP) मंडळ पुरते ‘पंक्चर’ झाले. मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्साह पुरता मावळला आहे.प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे आणि संघटनमंत्री सतीश धोंड यांनी दोन्ही कार्यकर्त्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला नाही.उलट नुकत्याच झालेल्या सुकुर पंचायत नवीन सरपंच निवडणूकीत खंवटे यांचा उमेदवार निवडून येणार नाही हे समजताच त्या दिवशी दस्तुरखुद संघटनमंत्री सतीश धोंड यांनी पंचायतीत उपस्थिती लावून योग्य चाल खेळून खंवटे यांच्या उमेदवारालाच सरपंचपदी विराजमान केले.त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांचे उरलेसुरले अवसान गळून पडले.या घटनेनंतर चार पाच दिवसांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी किशोर अस्नोडकर यांना मंडळ अध्यक्ष म्हणून जाहीर केले.त्यावेळी गुरुप्रसाद पावसकर,अशोक शेट्टी,राजकुमार देसाई व अन्य उपस्थित होते. त्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी ‘झाले गेले सर्व विसरून आम्ही पक्षासाठी काम केले पाहिजे’ असे आवाहन केले.त्यानंतर भाजप मंडळ आणि खंवटे कार्यकर्ते यांची संयुक्त बैठकही झाली. पण त्यात फारसा उत्साह नव्हता,असे कार्यकर्त्यांच्या देहबोलीवरून दिसत होते. पर्वरी भाजप कार्यकर्ते आणि रोहन खंवटे कार्यकर्ते यांची गळाभेट झाली पण मने दुखालेलीच आहेत.

दुसऱ्या बाजूने खंवटे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि आज तृणमूल कॉंग्रेस (TMC) पक्षातर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले संदीप वझरकर यांनी आपण खंवटे यांना पराभूत करणार असा चंग बांधला आहे.तसेच ते कार्यकर्त्यांना घेऊन जोरात प्रचारही करत आहे. कॉंग्रेस पक्षातर्फे विकास प्रभुदेसाई निवडणुक लढवीत आहेत.त्यांना या मतदारसंघात फारसे कोणी ओळखत नाहीत.तसेच पर्वरी कॉंग्रेस मंडळाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला असून त्यांनी काम न करण्यासाठी निश्चय केला आहे.आम आदमी पक्षातर्फे रितेश चोडणकर निवडणूक लढविणार आहे.पण त्यांचा म्हणावा तितका प्रभाव पडणार नाही.मागच्या दोन निवडणुकीत रोहन खंवटे यांनी ‘अपक्ष’ म्हणून निवडून येण्याचा करिष्मा केला होता.पण यावेळी राष्ट्रीय पक्षाची उमेदवार असुनही जास्त घाम गाळावा लागणार आहे असे एकंदरीत चित्र पाहता दिसत आहे. जर या निवडणुकीत ‘अपक्ष’ उमेदवार दयानंद नार्वेकर विजयी झाले तर पर्वरी मतदारसंघाच्या कापळी ‘अपक्ष’ आमदार असे लिहिले आहे. असे म्हणावे लागेल.

Rohan Khaunte
लोबो, जोशुआकडून आचारसंहितेचं उल्लंघन; गुन्हा दाखल

पक्षश्रेष्ठींचा ‘वरून’ आदेश

एका रम्य सकाळी पर्वरी मंडळाच्या कार्यकर्त्यांना पणजीतील (Panaji) भाजप कार्यालयात बोलावून प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे आणि संघटनमंत्री सतीश धोंड यांनी या मंडळाला आम्ही उद्या रोहन खंवटे यांना पक्षात प्रवेश देत असून उद्या पासून तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे,असे ठणकावून सांगितले.यावेळी काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आणि उलट ‘वरून’ असा आदेश आला आहे,असे सांगून त्यांना गप्प केले.तसेच त्यांना तुमच्या सारखे आम्हालाही दु:ख होत आहे.आम्ही काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेत आहोत,असे सांगून घरी पाठविले.

नाराज कार्यकर्त्यांची भीती

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत.पण ते जीव ओतून काम करतील, असे वाटत नाही. याची कल्पना खुद्द खंवटे यांना आली असून तेही मनाने घाबरल्याचे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट जाणवते. भाजपमधील एक गट माजी मंत्री दयानंद नार्वेकर यांना या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची गळ घालत आहेत. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत.त्यांचे जीवाभावाचे कार्यकर्ते या मतदारसंघात आहेत. त्यामुळे नार्वेकर पुन्हा निवडणूक लढवितात म्हणून त्यांच्यात उत्साह संचारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com