सांगे : भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सावित्री कवळेकर यांनी सांगेतून अपक्ष उमेदवारी (Independent candidacy) दाखल करण्याची तयारी चालवली असून मतदारांचा आर्शिवाद आपल्याच पाठिशी आहे, असा दावा त्यांनी केला.
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्या बोलत होत्या. जनतेच्या दारी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आर्शिवाद घेण्याच्या त्यांच्या अभियानाला खेड्यापाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांची होणारी गर्दी पाहून सावित्री कवळेकर जनतेच्या प्रेमाने भारावून जात असून तुमचा उत्साह आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देत असल्याचे त्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत.
गेली पाच वर्षे आपण सांगेतील जनतेची सेवा केली आहे. त्याचीच पावती म्हणून आपण अजूनही अर्ज भरलेला नसताना जो उत्साह आणि प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे, ते पाहता आपल्याला यशाची खात्री आहे,असे कवळेकर म्हणाल्या.
आजपर्यंत सांगे मतदारसंघात अनेक समस्या प्रलंबित आहेत. जर सांगेचा विकास झाला असता तर सांगे कधीच टँकरमुक्त झाला असता. आतापासूनच खेड्यापाड्यात लोक पाणी पाणी करीत आहे. सामान्य लोकांना रोजगार नाही. संपूर्ण सांगेत नेटवर्कची समस्या सतावत आहे. मग, इतक्या वर्षात कसला विकास झाला,असा सवाल विचारला जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.