Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: ‘’भांडवलदारांना खूश करणाऱ्या प्रकल्पांना गोमंतकीयांचा विरोधच...’’; भाजप सरकारवर बरसले आलेमाव

Yuri Alemao Criticized the BJP government: आलेमाव यांनी भांडवलदारांना खूश करण्यासाठी आमच्यावर जबरदस्तीने लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांना गोमंतकीय विरोध करतीलच असे स्पष्ट केले.

Manish Jadhav

Yuri Alemao Criticized the BJP government: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा आम्ही पुन्हा एकदा जिंकू शकतो, असा विश्वास भाजपला होता. मात्र निकालानंतर भाजपला केवळ उत्तर गोव्याचीच जागा जिंकता आली. दक्षिण गोव्यात काँग्रेसने भाजपला मात दिली. विरियातो फर्नांडिस यांनी बाजी मारली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधकांनी राज्यातील अनेक प्रश्नांकडे सत्ताधाऱ्या भाजपचे लक्ष्य वेधले होते. यातच आता, या प्रश्नांवरुन युरी आलेमाव यांनी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारवर टीकास्त्र डागले.

गोमंतकीयांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रकल्पांचे गोमंतकीयांनी नेहमीच स्वागत केले आहे. अटल सेतू, कला अकादमी, राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी तयार केलेल्या साधन-सुविधा, पणजी स्मार्ट सिटी ही भ्रष्ट भाजप सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करुन, भाजपच्या सग्यासोयऱ्यांची तिजोरी भरण्यासाठी निर्माण केलेल्या भ्रष्टाचाराच्या स्मारकांची काही उदाहरणे आहेत, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी "काहींना सरकारी प्रकल्पात अडथळे आणण्याची सवय आहे" या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भांडवलदारांना खूश करण्यासाठी आमच्यावर जबरदस्तीने लादलेल्या विनाशकारी प्रकल्पांना गोमंतकीय विरोध करतीलच असे स्पष्ट केले.

कोणताही प्रकल्प प्रस्तावित करताना सर्वांना विश्वासात घेणे आणि संपूर्ण पारदर्शकता ठेवणे हे शासनाचे कर्तव्य आहे. गेल्या अकरा वर्षात भाजप सरकारने निकृष्ट दर्जाचे प्रकल्प तयार केले कारण कंत्राटदारांना भाजप भागधारकांना मोठ्या प्रमाणात कमिशन द्यावे लागते, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

भूतकाळातील काँग्रेस सरकारांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावनांचा आदर केला. तीन सेझ प्रकल्प आणि प्रादेशिक आराखडा लोकांच्या शक्तीपुढे नतमस्तक होवून रद्द केले. काँग्रेसने नेहमीच गोमंतकीयांच्या भावना आणि आकांक्षांची काळजी घेतली, असेही आलेमाव पुढे म्हणाले.

भाजप सरकारने पणजी स्मार्ट सिटीसाठी जवळपास 1500 कोटी रुपये, कला अकादमीच्या दुरुस्तीवर 75 कोटी, राष्ट्रीय खेळांवर 1000 कोटी आणि अटल सेतूवर 700 कोटी रुपये खर्च केले, परंतु कामाचा दर्जा अतिशय खराब झाल्याने नेहरु स्टेडियम, फातोर्डा येथील पत्रे उडणे, श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या दर्शनी भागाची पडझड होणे, अटल सेतूवर तयार झालेले खड्डे, कला अकादमीचा स्लॅब कोसळणे आदी प्रश्नांकडे युरी आलेमाव यांनी लक्ष वेधले.

भाजप सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेकडो निष्पाप गोमंतकीयांचे प्राण गेले. विद्युत खात्यावर 12 हजार कोटी रुपये खर्च करुनही विजेच्या धक्क्याने 65 व्यक्ती आणि 17 जनावरांचा मृत्यू झाला. बंच केबलिंग हा घोटाळा असल्याचे सिद्ध झाले आहे , असे युरी आलेमाव यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून भाजपने धडा घ्यावा. गोव्यात 2027 मध्ये नवीन इंजिन सरकार असेल हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT