Yuri Alemao: 'कुंकळ्ळीचा आमदार म्हणून मतदारसंघाच्या सुधारणेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय'; आता कुंकळ्ळीकरांनी सहकार्य करावे

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते व आमदार युरी आलेमाव यांच्याकडून कुंकळ्ळीत विकास कामांना सुरूवात
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak

Yuri Alemao: विरोधी पक्षनेते व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्या हस्ते चिफटेन मेमोरीयल स्मारकाचे सुशोभीकरण, चांदोर येथे 200 केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविणे, गुटली तळीचा विकास, माकाझन तलावाभोवती संरक्षण भिंत बांधणे, पथदिप आदी अनेक विकास कामांचा कुंकळ्ळी मतदारसंघात शुभारंभ करण्यात आला.

कुंकळ्ळी मतदारसंघात भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. विविध अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणही टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. नवीन नाल्यांचे बांधकाम तसेच नाले झाकण्याचे कामही सुरू झाले आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

हुतात्मा स्मारकाच्या सुशोभिकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. कुंकळ्ळी नगरपालीका सभागृहाच्या बाहेरील खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करण्याची आमची योजना आहे.

चांदर गांवचा वारसा स्थळ म्हणून विकास करण्यासाठी मी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

चांदर येथे वार्षिक "हेरिटेज फेस्टिव्हल" आयोजित करण्यासाठी मी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांना आधीच पत्र लिहिले आहे.

सरकार लवकरच कुंकळ्ळीच्या प्रसिद्ध "छत्रौत्सवाला" गोवा राज्य महोत्सव म्हणून अधिसूचित करेल अशी आशा मी बाळगतो, असे युरी आलेमाव म्हणाले.

Yuri Alemao
Dabolim News : दाबोळीपुढे आता कारवारचेही आव्हान! नौदलाचा प्रकल्प येतोय आकाराला

कुंकळ्ळीत अत्यंत आवश्यक असलेले आरोग्य केंद्र बांधण्यासाठी जागा ओळखली आहे. सदर प्रकल्पासाठी सरकारने वेळेत निधी द्यावा व वेळेत काम पूर्ण करावे अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

मला कुंकळ्ळीच्या विविध निराकरण न झालेल्या समस्यांची जाण आहे आणि सर्व प्रलंबित समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी योग्य पाऊले उचलली आहेत.

कुंकळ्ळीला एक आदर्श मतदारसंघ करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

2012 ते 2022 पर्यंत जवळपास 10 वर्षे कुंकळ्ळी मतदारसंघ उपेक्षित राहिला. कुंकळ्ळीचा आमदार बनल्यानंतर माझ्या मतदारसंघाच्या सुधारणेसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हाती घेतलेल्या कामांसाठी कुंकळ्ळीकरांनी सहकार्य करावे आणि पाठिंबा द्यावा अशी कळकळीची विनंती युरी आलेमाव यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com