Michael Lobo

 

Dainik Gomantak 

गोवा

एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या लोकांबरोबर जनता कधीच नसते: लोबो

बार्देशातील (Bardez) नेरूल पुलाच्या खाली उभारण्यात येत असलेल्या नवीन बांधाची पायाभरणी केल्यानंतर मायकल लोबो (Michael Lobo) बोलत होते.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या लोकांबरोबर जनता कधीच नसते. त्यांचे पक्षांतर स्वत:च्या भल्यासाठी असते. जनतेच्या नव्हे, असा उपहासात्मक टोला कळंगुटचे आमदार तथा घनकचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी सध्या चाललेल्या पक्षांतरावरून आमदारांना हाणला.

बार्देशातील (Bardez) नेरूल पुलाच्या खाली समांतर उभारण्यात येत असलेल्या नवीन बांधाची पायाभरणी केल्यानंतर मायकल लोबो (Michael Lobo) बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस, कळंगुट जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोलकर, जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. राज्यात अनेक स्थानिक पक्ष कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना गोव्याची (Goa) पूर्णपणे नाळ माहीत आहे. असे असताना काही राजकीय व्यक्ती पैशांच्या लोभापायी नको त्या पक्षांशी हातमिळवणी करत असल्याचा आरोप लोबो यांनी यावेळी केला. परंतु नेत्यांनी जरी पक्ष सोडला तरी जनता मात्र पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे लोबो यांनी सांगितले. राज्यातील मतदार सध्या लोबोंच्या राजकीय हालचालींवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे तुम्ही निवडलेला आगामी राजकीय पक्ष (Political Party) कुठला असेल, या प्रश्नांवर तुम्हाला स्थानिक जनताच उत्तर देईल, असे लोबो यांनी सांगितले.

पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

राज्यातील वाढती गुन्हेगारी तसेच पर्यटकांवर (Tourist) होणारे हल्ले आणि नुकतेच शिवोलीत घडलेल्या अत्याचार प्रकरणाने पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. किनारी भागातील पोलिसांना याबाबत सतर्क राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोस्टल फोर्स तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पिंक फोर्स कार्यान्वित करण्यात आली आहे, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT