भाजप सरकारची कारकीर्द भ्रष्ट, असंवेदनशील आणि विश्‍वासघाताची: चोडणकर

पणजीतील (Panaji) काँग्रेस कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर (Girish Chodankar) बोलत होते.
Girish ChodankarElection

Girish Chodankar

Election

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: भाजप सरकारची गेल्या दहा वर्षांतील कारकीर्द भ्रष्ट, असंवेदनशील व विश्‍वासघाताची आहे. त्‍यामुळे या सरकारला लोकांनी आता घरी पाठवण्याचा निश्‍चय केला आहे. पराभव समोर दिसू लागल्यावर मतदारांची मने वळविण्यासाठी भाजप सरकारला देव, मंदिरे तसेच धर्माची आठवण झालीय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

Girish Chodankar

Election

Omicron Alert: गोवा मुख्यमंत्र्यांचे पर्यटन उद्योगाला कोविड त्रिसुत्री पाळण्याचे निर्देश

पणजीतील (Panaji) काँग्रेस कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर (Girish Chodankar) बोलत होते. यावेळी पदाधिकारी अमरनाथ पणजीकर, बाबी बागकर, पक्ष कायदा सल्लागार कार्लुस आल्वारिस परेरा, उदय मडकईकर, आग्नेल फर्नांडिस उपस्थित होते.

निवडणुका (Election) जवळ आल्या की मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी देव आणि धर्माला पुढे करून भाजपकडून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना मंदिरांची आठवण होते. गेल्या दहा वर्षांत सत्तेवर भाजपचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी ही मंदिरे का बांधली नाहीत? निवडणुकीच्या तोंडावरच मंदिरांचा विषय काढण्याचे प्रयोजन काय? असे प्रश्न चोडणकर यांनी उपस्‍थित केले. ‘भाजपाच्या हाती सत्ता द्या, गोव्यातील भाषा माध्यम प्रादेशिक करू’ असे मंदिरात गाऱ्हाणी घालून सांगणाऱ्या भाजपने (BJP) देवालाही फसविले आहे. आता पक्षापासून दूर जात असलेल्या मतदारांना रोखण्यासाठी सरकारने मंदिरे (Temple) बांधण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र गोव्यातील जनता त्यांचे हे डावपेच ओळखून आहे. राजकीय विफलतेतून मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) करत असलेल्या बेताल वक्तव्यांना जनता जशास तसे उत्तर देईल. निवडणूक आली की देव आठवणाऱ्या भाजपच्या महाठकांना लोक मत देणार नाहीत. काँग्रेस (Congress) पक्षच राज्‍यात पुढील सरकार स्थापन करेल, असा विश्वासही चोडणकर यांनी व्यक्त केला.

Girish Chodankar

Election

गोव्यातील 4 पर्यटन प्रकल्पांमध्‍ये सुमारे 230 कोटींची गुंतवणूक

या सरकारने गेल्या दहा वर्षांत गोमंतकीयांवर अन्यायच केला आहे. भांडवलदारांच्या फायद्यासाठी गोव्याला ‘कोल हब’ बनवण्याचा घाट घातला. बेरोजगारीत गोव्याला देशात २ नंबरचे राज्य बनवले. लाखो रुपयांना सरकारी नोकऱ्या विकून मंत्र्यांनी करोडो रुपये कमावले. पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे, असे चोडणकर म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com