पेडणे : कळणे नदीचे पाणी उपलब्ध झाल्यावर पेडणे तालुक्यात पिण्यासाठी, शेती व औद्योगिक वापरासाठी अखंडितपणे पाणीपुरवठा सुरु राहिल. यामुळे पाण्याची मोठी समस्या एका वर्षाच्या आत पूर्णपणे सुटणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बैलपार येथे व्यक्त केला. जलस्त्रोत खात्याअंतर्गत कळणे नदीवर 12.950 किलोमीटर क्षेत्रात पाणी अडवून ते शक्तीशाली पंपाद्वारे खेचून वापरण्यात येणार आहे. या कामाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
तीन वर्षापूर्वी कामाला लागलो होतो, आता ही योजना प्रत्यक्षात येत आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत तिलारी कालव्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येते. यामुळे काही वेळा पाणीपुरवठा (Water Supply) बंद ठेवण्यात येतो. तर काहीवेळा पाणीपुरवठा मर्यादित प्रमाणात असतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह मोठी समस्या निर्माण होते.
पेडणे (Pernem) तालुक्यातील वाढती लोकसंख्या, मोपा विमानतळ (Mopa Airport), आयुष हॉस्पितळ अशा प्रकल्पाबरोबरच शेती व औद्योगिक वापरासाठी या कळणे नदीच्या पाण्याचा चांगल्याप्रकारे उपयोग होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.