Azadi Ka Amrit Mahotsav Dainik Gomantak
गोवा

...तर त्यांना भाजप कार्यालयातून मिळणार मोफत तिरंगा

आर्थिक समस्यांमुळे ध्वज विकत घेणे शक्य नाही त्यांना भाजप कार्यालयातून मिळणार मोफत तिरंगा

दैनिक गोमन्तक

गोवा: आर्थिक समस्यांमुळे राष्ट्रध्वज विकत घेणे शक्य नाही त्यांनी भाजप कार्यालयातून मोफत तिरंगा घेऊन हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे आवाहन सुभाष फळदेसाई यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना13 ते 14 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून किंवा प्रदर्शित करून 'हर घर तिरंगा' चळवळ मजबूत करण्याचे आवाहन केले. ट्विट करत ते म्हणाले की या चळवळीमुळे तिरंग्याशी आमचा संबंध अधिक दृढ होईल आणि त्यांनी नमूद केले की 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता.

(people get free national flag from BJP office)

‘आझादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने हर घर तिरंगा, तिरंगा रॅली, मोटारसायकल रॅली, मूक रॅली, ऐतिहासिक वारसा स्थळांवर ध्वजारोहण, शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत प्रभात फेरी, विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. गुरुवार, 11 रोजी आग्वाद कारागृह संग्रहालयावर ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान, स्वातंत्र्यसैनिकांचा गौरवही करण्यात आला. राज्यात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

14 ऑगस्ट रोजी विभाजन हुतात्मा स्मरण दिवस

14 ऑगस्ट रोजी विभाजन हुतात्मा स्मरण दिवस पाळला जाणार आहे. यासाठी पणजी आणि म्हापसा बस स्टॅण्डवर फोटो आणि पोस्टर प्रदर्शन होत आहे. हे प्रदर्शन पुरातत्व आणि अभिलेख खात्याच्या वतीने भरवण्यात येणार आहे. चर्च स्क्वेअर ते आझाद मैदान आणि वास्को येथे मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. तर 15 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्वच 12 ही तालुक्यांच्या ठिकाणी मंत्री आणि आमदार ध्वजारोहण करतील. यानिमित्ताने माहिती आणि प्रसिद्धी खात्याने स्पर्धांचे आयोजन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT