Water shortage  Dainik Gomantak
गोवा

भर उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे गोवेकर त्रस्त

अनेक भागात लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील अनेक भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत आहे. शिवोली आणि मोरजी येथील अनेक ठिकाणी दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो. परिणामी येथील लोकांना पुरेसे पाणी मिळत नाही. (people facing water shortage in goa)

गोव्यातील अनेक भागात पाणी पुरवठा सुधारण्याऐवजी बिघडतच चाललेला आहे. अधिकृत माहितीनुसार, अनेक ठिकानची पाईपलाईन जुनी झाली आहे. यामुळे काही ठिकाणी पाईप फुटून पाण्याची गळती सुरू आहे. याचबरोबर जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये बिघाड, रुंद पाईपलाईन आणि पाण्याचे असमान वितरण यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

“आमच्या कुटुंबात 11 सदस्य आहेत. आम्ही आमच्या विहिरीचे पाणी इतर सर्व गरजांसाठी वापरतो, मात्र पिण्यासाठी शुद्ध पाण्याची गरज भासते. PWD आम्हाला स्वखर्चाने पाईपलाईन बदलण्यास सांगत आहे,” एका नागरिकाने सांगितले.

काही भागात PWD टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. मात्र, तरीही लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. लोकांच्या म्हणण्यानुसार, पीडब्ल्यूडी आठ दिवसांनी एक टँकर पाठवते, तोही वारंवार पाठपुरावा केल्यानंतर. आम्ही पणजी येथील मुख्य अभियंत्याला भेटलो, मात्र समस्येचे निवारण झालेले नाही. आमच्याकडे हजर राहण्यासाठी फक्त एक PWD प्लंबर उपलब्ध आहे आणि आमच्या समस्येचे निवारण करण्यासाठी कोणताही अधिकारी पुढे येत नाही,” अशी खंत लोकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT