Unseasonal rains destroy rice farming
Unseasonal rains destroy rice farming Dainik Gomantak

सलग दोन दिवस अवकाळी पाऊस; मयेतील भातशेती आडवी

काही शेतकऱ्यांनी घेतली कापणी आणि मळणीची कामे उरकून
Published on

डिचोली: सलग दोन दिवस अवकाळी पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे डिचोलीत वायंगण भातशेतीचे बरेच नुकसान झाले. वायंगणी शेती कापणीसाठी तयार झाली असतानाच, सलग दोन दिवस जोरदार पाऊस पडल्याने मयेसह अन्य भागांत भाताची कणसे आडवी पडली. कापणीच्या तोंडावर अवकाळी पावसाने कहर केल्याने शेतकरी सध्या चिंताग्रस्त झाले आहेत.

अवकाळी पावसाचा कहर असाच सुरू राहिल्यास यंदा वायंगणी भातशेती बुडाल्यातच जमा असेल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. अवकाळी पावसाचा धोका ओळखून मयेतील काही शेतकऱ्यांनी आहे त्याच स्थितीत आणि शक्य आहे त्या भातपिकाची कापणी आणि मळणी हाती घेतली आहे. मंगळवारी काही शेतकऱ्यांनी यंत्राच्या मदतीने कापणी आणि मळणीची कामे काही प्रमाणात उरकून घेतली.

Unseasonal rains destroy rice farming
गोव्यात अजूनही रेती वाहतूक चालूच...

शेतीला वातावरण पूरक; पण पावसामुळे पीक आडवे

डिचोलीतील मयेसह पिळगाव, कुडचिरे आदी भागांत शेतकरी वायंगणी शेती करतात. यंदा वायंगणी शेतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण झाले होते. भातशेती पिकून कापणीसाठीही तयार झाली होती. शेतकरी भात कापणी आणि मळणीच्या तयारीला लागले असतानाच अवकाळी पावसाने कहर केला. त्यामुळे शेतकरी हताश झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com