people face inconvenience at Pernem market due to heavy rain Dainik Gomantak
गोवा

पेडणेत पावसाच्या बेगमीची खरेदी करता न आल्याने लोकांची गैरसोय

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

दैनिक गोमन्तक

पेडणे : अवकाळी पावसामुळे पेडणे येथील आठवड्याच्या बाजारावर परिणाम झाला. पावसाळ्याच्या तयारीसाठीचे सामान खरेदी करता न आल्याने लोकांची गैरसोय झाली. दुसऱ्या बाजूने ग्राहक नसल्याने विक्रीवरही परिणाम झाला. (people face inconvenience at Pernem market due to heavy rain)

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने काल सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पेडणे येथील आठवड्याचा बाजार सकाळी 8 च्या सुमारास सुरू होऊन रात्री 8:30 पर्यंत असतो. पावसाळा तोंडावर आल्याने त्याच्या तयारीसाठी हा बाजार महत्त्वाचा होता. त्यातच बाजारात सुकी मिरची आवश्यक प्रमाणात न आल्याने ग्राहक मिरचीच्या प्रतीक्षेत होते. या बाजारात विविध प्रकारची सुकी मासळी, विविध प्रकारची कडधान्ये, मसाले पदार्थ, मिरची आदी जीवनावश्यक वस्तू आल्या होत्या. मात्र दुपारी 2 वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाली व संध्याकाळी पावसाचे प्रमाण वाढत गेले. मार्केटच्या चौकात मिरचीची विक्री केली जाते. याठिकाणी छप्पर नसल्याने पाऊस सुरू झाल्यावर विक्रेत्यांना मिरच्या पोत्यात भरून सुरक्षित ठिकाणी हलवाव्या लागल्या. पावसामुळे काही सामानांची विक्रेत्यांना आवराआवर करावी लागली.

सकाळपासून दुपारपर्यंत ज्या ग्राहकांनी पावसाच्या पूर्वतयारीसाठी खरेदी केली त्यांचे फावले. पाऊस पडण्याअगोदर मिरचीचा दर 700 रुपये किलोपासून होता. मिरचीच्या दर्जानुसार हा दर पुढे वाढीव होता. पेडणे तालुक्यातील मिरचीबरोबर सिंधुदुर्गमधूनही मोठ्या प्रमाणात मिरची या बाजारात विक्रीला येते. त्यात हरमलच्या मिरचीला जास्त मागणी असते. त्याचा दरही जास्त असतो. या बाजारात हरमलच्या मिरचीचा दर 1 हजार रुपयांपासून होता. यंदा 1 जूनला मॉन्सून गोव्यात पोचणार, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी एकच आठवड्याचा बाजार मिळणार असून, येत्या तेव्हातरी पावसाळ्याच्या तयारीसाठीचे सामान खरेदी करण्यास मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! ‘द हंड्रेड’मध्ये आरसीबीच्या खेळाडूंचा धमाका; जेकब बेथेलने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT