मेरशी येथे खारफुटी वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

मेरशी खाजन,खारफुटी वृक्ष तोड प्रकरणी गुन्हा दाखल
Tree Cutting
Tree CuttingDainik Gomantak

पणजी : राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या मेरशी येथील खाजन जमीनमधील खारफुटी वृक्षतोड प्रकरणी नगर नियोजन खात्याने अॅक्शन मोडवर येत कारवाई सुरु केली आहे. यामूळे कूळ संघटनेवर गुन्हा दाखल झाला आहे. ही जमीन कोमुनिदादची असून कुळांकडून वापरली जाते. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या खारफुटीचे संरक्षण महत्त्वाचे असताना मेरशी जवळची खारफुटीची 29 झाडे नष्ट करण्यात आली आहेत याप्रकरणी गोवा वृक्ष संवर्धन कायदा 1984 चे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने या कायद्याअंतर्गत जमीन मालकांना नोटीस बजावण्यात आली होती. (Filed a case in tree felling case at Mershi)

आता याप्रकरणी संबंधितांवर नगर नियोजन कायदा 1974 कलम 17 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही जमीन कोमुनीदादची असून काही कुळांकडून वापरली जाते. त्यांनी या जमिनीत जाणाऱ्या खाऱ्या पाण्याचा पुरवठा बंद केल्याने खारफुटी झाडांच्या मोठे नुकसान झाले आहे. राज्यात खारफुटी वृक्ष तोडीची कोणतीही कृती सहन केली जाणार नाही त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.

Tree Cutting
मुरगाव पालिका इमारतीत पावसाचे पाणी; कर्मचाऱ्यांची एकच धांदल

मोपा लिंक रोडसाठी 7218 झाडे तोडण्यास परवानगी ; मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न कायम

मोपा विमानतळ लिंक रोडच्या बांधकामासाठी उप वनसंरक्षकांनी परवानगी दिली आहे. यासाठी काजू, आंबा आदींसह शेकडो फळझाडे काढली जात आहेत. मात्र पिडीत शेतकऱ्यांनी यापूर्वीच न्यायालयात धाव घेऊन लिंक रोडचे काम थांबवण्याची मागणी केली होती.

Tree Cutting
मडगावचे माजी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना पालिकेकडून निरोप

राजकारण्यांच्या हस्तक्षेपासह अनेक कारणांमुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी या प्रकल्पास विरोध केला आणि भूसंपादन अधिकाऱ्यांसह जमीन साफ ​​करणे थांबवण्यास सांगितले, तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने पोलिसांना आंदोलकांना अटक करण्यास सांगितल्याची बाब समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com