Drones Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील नौदल कॅम्पचा परिसर 'नो फ्लाय झोन' म्हणून घोषीत

परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात उड्डाण करणारे हवाई ड्रोन (Drones) जप्त करण्याचा किंवा नष्ट करण्याचा अधिकार भारतीय नौदलाकडे (Indian Navy) आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील नौदल (Naval installations in Goa) कॅम्पच्या परिसर मैदानापासून तीन किलोमीटर अंतरावरील ड्रोनला (Drones) भारतीय नौदल (Indian Navy) परवानगी देणार नाही. कारण त्या भागाला 'नो फ्लाय झोन' म्हणून घेषीत करण्यात आले आहे. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “गोव्यातील कॅम्पच्या परिसर मैदानापासून तीन किलोमीटरच्या भागाला 'नो फ्लाय झोन' (No Fly Zone) असे नाव देण्यात आले आहे. सर्व लोकं आणि नागरी एजन्सीना कोणत्याही कारणास्तव या भागात कोणत्याही प्रकारचे हवाई ड्रोन उडवण्यास मनाई आहे.' (Part of Naval installations in Goa declared as No Fly Zone)

भारतीय नौदलाने पुढे म्हटले आहे की, जर कोणताही ऑपरेटर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळले तर तो कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार जबाबदार असेल. कोणतीही परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात उड्डाण करणारे हवाई ड्रोन किंवा अज्ञात वाहने जप्त करण्याचा किंवा नष्ट करण्याचा अधिकार भारतीय नौदलाकडे आहे.

पूर्वपरवानगीविना या भागात उड्डाण करणारे कोणतेही हवाई ड्रोन किंवा मानवरहित हवाई वाहन (UAV) जप्त करणे किंवा नष्ट करण्याचा हक्क भारतीय नौदलाकडे आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्‍या ऑपरेटरवर कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार कारवाई केली जाऊ शकते, असे भारतीय नौदलाने निवेदनात सांगितले.

यापुढे अशी माहिती देण्यात आली की, ड्रोनचा वापर वेळोवेळी गृह मंत्रालयाने केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांद्वारे केला जातो. नागरी उड्डान महासंचालक (DGCA) कडून परवानगी मिळविण्यासाठी डिजी स्काई वेबसाइट (www.dgca.nic.in) वर मिळवावी आणि मान्यता पत्राची एक प्रत गोवा नौदल क्षेत्र मुख्यालय किंवा संबंधित नौदल स्थानकाला सादर करावी. ही परवानगी विहित. उड्डाण कार्य करण्यापूर्वी कमीतकमी एक आठवडा आधी घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT