Goa: सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

नागरिकांतून कौतुकाचा वर्षाव (Goa)
Goa: Human Resource Corporation staff cleaning a house at Bhatwadi.
Goa: Human Resource Corporation staff cleaning a house at Bhatwadi.Dainik Gomantak

Goa: हरमल : गोवा शासनाच्या (Goa Government) मानव संसाधन महामंडळाच्या (Human Resource Corporation) सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माणुसकीची झलक दाखवीत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. (Gave a helping hand to the flood victims.) वैशिष्ट्य म्हणजे, ढिगाऱ्याखाली सापडलेली लाखोंची मालमत्ता वाचविण्यात यश मिळाले. या कार्यामुळे नागरिकांतून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. गोवा मानव संसाधन महामंडळाचे व्यवस्थपकीय संचालक नारायण नावती (Narayan Navti) यांच्या नेतृत्वाखाली व सुरक्षा अधिकारी अमर मळीक व १३ जणांच्या पथकाने ही मोहीम राबविली.

Goa: Human Resource Corporation staff cleaning a house at Bhatwadi.
Goa: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला माजी साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर जबाबदार

सत्तरी (Sattari) तालुक्यातील भटवाडी अडवई भागात सावईकर यांच्या तीन कुटुंबाची लाखोंची मालमत्ता सुस्थितीत काढून दिली. मातीच्या ढिगाऱ्याखालील दोन कपाट, त्यातील दागिने, महत्त्वाची कागदपत्रे त्यांच्या देखत उघडण्यात आली. शिवाय २ रेफ्रिजरेटर, टेबल, खुर्च्या, चार चाकी गाडी तसेच गॅस स्टोव्ह, इंदकॅशन, मिक्सर, ग्राइंडर, वॉशिंग मशीन व किमती लाकडी इमारतीचे सामान हुडकून काढण्यात आले. प्रत्येक वस्तू सावईकर कुटुंबाच्या व्यक्तीकडे देण्यात आली. साधारण १३ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ८ तासांत अथक परिश्रम घेत मोहीम राबवली.

Goa: Human Resource Corporation staff cleaning a house at Bhatwadi.
Goa Flood: तारी कुटुंबाला जिल्हा पंचायत अध्यक्षाकडून आर्थिक मदत

या गटात निलेश कोपर्डेकर, मोहन मळीक, संदेश हरिजन, पवन माईनकर व प्रज्योत हरवळकर सहभागी झाले होते. वाळपई भागातील अनेक कर्मचारी महामंडळात असून त्यांच्याप्रती सहानुभूती दाखविल्याने नागरिकांनी प्रशंसा केली.

Goa: Human Resource Corporation staff cleaning a house at Bhatwadi.
Kargil Vijay Diwas: गोव्यात कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com