Goa: आता राहिली फक्त माती अन् कटू स्मृती!

खांडेपार, मुर्डी, वाघुर्मेसह गांजे - उसगाव, भामईतील पूरग्रस्त झाले सुन्न
House collapsed
House collapsedDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : न भूतो न भविष्यती असे अस्मानी संकट फोंड्यासह (Phonda - Goa) लगतच्या तालुक्यात कोसळल्याने बेघर झालेल्या लोकांची स्थिती सध्या बिकट झाली आहे. गेल्या शुक्रवारी (Friday) पहाटे अचानकपणे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने फोंडा तालुक्यासह लगतच्या भागातील अनेक घरांना या महापुराचा फटका बसला. गांजे, भामई, उसगाव, पाळी (Ganje, Bhamai, Usgao, Pali) तसेच खांडेपार - मुर्डी - वाघुर्मे (Khandepar, Murdi, Vaghurme) आदी भागात घरे कोसळल्याने लोकांच्या डोक्यावरील छतच नाहीसे झाले आहे. कोसळत्या पावसात डोक्यावरील छत नाहीसे झाल्याने बेघर झालेल्या या लोकांनी आपापले नातेवाईक, फर्मागुढी मंदिर रेसिडेन्सी तसेच मित्रांच्या घरात (Friends House) आसरा घेतला आहे. गेले दोन दिवस घशाखाली अन्नाचा घास गेलेला नाही. लोक मदत देत आहेत, पण घरच नाहीसे झाल्याने करायचे काय, असा आर्त सवाल या संकटग्रस्तांनी केला आहे.

मुर्डी - खांडेपार भागात तीन घरांची मोठी हानी झाली आहे. या तिन्ही कुटुंबीयांची व्यवस्था कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी फर्मागुढी - फोंड्यातील गोपाळ गणपती देवस्थानच्या रेसिडेन्सीमध्ये केली आहे. त्यांना जेवण खाणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र, घर कोसळल्याने हे लोक विमनस्क झाले आहेत. घरे कोसळली पण होते नव्हते सगळे पुरात वाहून गेले, टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशिन, कपाटे, कपडे सगळे... सगळे मातीमोल झाले. काहीजणांना तर अचानकपणे पाणी भरल्याने नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पळावे लागले. पाणी भरूनही जी घरे सुरक्षित राहिली त्या घरात ढोपरभर चिखल आणि कचरा साचला आहे. ही घरे साफ करण्यासाठीच हजारो रुपये खर्च करावे लागणार आहेत.

तिराळ - टाकवाडा भागात बेघर झालेल्यांनी आपापल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला आहे. पुलार - भामई येथे एक घर तसेच काही दुकाने कोसळली आहेत. राहते घर आणि रोजीरोटी चालवणारे दुकानच जमीनदोस्त झाल्याने या लोकांवर आभाळच कोसळले असून काय करायचे, हाच विचार या लोकांना सतावत आहे. नदीकिनारी असलेल्या घरांना मोठा फटका बसला आहे. गांजे - उसगावात शांबा फडते, महादेव फडते, सूर्या गावकर, संदीप नाईक आदींची घरे कोसळल्याने ही कुटुंबे बेघर झाली आहेत.
दरम्यान, घर तर गेलेच पण कुठे आश्रय घ्यायचा म्हटले तर वीज नाही, पाणी नाही अशा विचित्र कात्रीत आपद्ग्रस्त सापडले आहेत. रविवारी संध्याकाळी काही प्रमाणात पाण्याचा पुरवठा सुरू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com