Parra Road News Dainik Gomantak
गोवा

Parra Road: "माझ्या जागेत गाड्या लावल्याच कशा?" पर्रा रोडवर स्थानिक आणि फोटोग्राफरमध्ये 'धक्काबुक्की'

Parra Road Fight: क्लायंटसोबत फोटोग्राफी करायला आलेल्या दर्शन नाईक नामक फोटोग्राफरला एका स्थानिकाकडून शिवीगाळ करण्यात आली

Akshata Chhatre

पर्रा: गोव्यात पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या पर्रा रोडवर शनिवारी (दि. १५) संध्याकाळी एक विचित्र घटना घडली. क्लायंटसोबत फोटोग्राफी करायला आलेल्या दर्शन नाईक नामक फोटोग्राफरला एका स्थानिकाकडून शिवीगाळ करण्यात आली आहे.

दर्शन नाईक हा फोटोग्राफर ठरल्यानुसार त्याच्या टीमसह पर्रा येथे फोटोशूट करायला आला असताना स्थानिकाने त्याला चुकीचे शब्दप्रयोग करत हिणवलं, तसेच धमकी देखील दिली. सध्या याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर बराच फिरताना दिसतोय. नाईक आणि त्यांच्या टीमने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला सुरक्षितपणे पार्क केली होती. तरीही एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि आक्रमकपणे, जमिनीवर मालकीचा दावा करत त्यांना शिवीगाळ केली. त्या व्यक्तीने केवळ अपशब्द वापरले नाहीत, तर भांडण करण्याचा प्रयत्नही केला आणि अनावश्यक गोंधळ निर्माण केला.

या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे आणि सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा धमक्या केवळ कायदेशीर कामात व्यत्यय आणत नाहीत, गोवा हे क्रिएटिव्ह आणि व्यवसायांसाठी एक सुरक्षित ठिकाण मानलं जातं मात्र अशा घटना गोव्याची ही प्रतिमा देखील मलिन करतात.

समोर असलेला अज्ञात स्थानिक व्यक्ती देखील फोटोग्राफरवर शिवीगाळ केल्याचे आरोप करतोय आणि त्याची मालकी असलेल्या जागेत गाड्या उभ्या केल्याच कशा असा प्रश्न विचारतोय. फोटोग्राफरने देखील त्याने गाडी व्यवस्थित जागेत गाडी लावल्याचं सांगितलं, मात्र हा वाद शिगेला पोहोचल्याने स्थानिक दगड घेऊन फोटोग्राफरवर वार करताना दिसतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

Goa Sports Policy: राज्यासाठी नवे क्रीडा धोरण डिसेंबरपर्यंत आखणार! गावडेंची घोषणा; प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणार

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

POP Idols: देवाच्या उत्सवातही भेसळ! पीओपी मूर्तींना शाडूचा लेप लावून होतेय विक्री; विसर्जनस्थळी अजूनही मूर्तींचा खच

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

SCROLL FOR NEXT