Parra Road
Parra Road Dainik Gomantak

Parra Road : पर्ये-साखळी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक; एकाच वेळी चार पुलांचे बांधकाम

Parra Road : चारही बगल रस्ते झालेय मृत्युचे सापळे
Published on

Parra Road :

पर्ये, साखळी-चोर्ला घाट मार्गातील मार्गावरील पर्येतील तुळशीमळा व मठवाडा येथे पाऊस तोंडावर असताना एप्रिल-मे महिन्यात इथल्या चार पुलांचे काम हाती घेतले आहे.

हे काम सुरु केल्यावर या रस्त्याला बाजूने पर्यायी रस्ता बनवून तिथून वाहतुकीची सोय केली होती. मात्र सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे.

या रस्त्यावरील जीर्ण झालेले साकववजा पूल मोडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहेत. खरे तर पावसापूर्वी या पुलांचे काम पूर्ण करून पुन्हा रस्ता वाहतुकीस खुला करायला हवा होता, पण अजूनपर्यंत काम पूर्ण न झाल्याने पर्यायी बनवलेल्या रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे येथून वाहतूक करणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे.

Parra Road
North Goa Court: मंत्री बाबूश आणि माविन यांच्‍या विरोधातील खटले उत्तर गोव्‍यातील न्‍यायालयात वर्ग

वाहतूक करणारे दुचाकी आणि चारचाकी चालक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. हे काम त्वरित पूर्ण करून मुख्य रस्तावरून वाहतूक सुरु करावी अशी मागणी होत आहे. सरकार तसेच स्थानिक पंचायतीने यावर गांभीर्याने लक्ष देऊन धोकादायक ठरत असलेल्या या मार्गावर उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.

अजून वेळ लागणार

दरम्यान, या रस्त्याच्या पुलाचे काम येन पावसाळ्याच्या तोंडावर एप्रिल-मे महिन्यात सुरु केले होते. अशा पुलाचे कामा करण्यासाठी बराच वेळी लागत असल्याने ऐन पावसाच्या तोंडावर काम करायला परवानगी देणे म्हणजे प्रवाशांच्या जिवावर खेळण्यासारखे झाले असे मत व्यक्त केले जाते. या मार्गावर सध्या चार ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी बऱ्याच वेळ लागणार अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com