Parra Dainik Gomantak
गोवा

Parra News : मोर्लेत ‘उभो गुणो’ नदीकाठ होतोय विद्रूप; मद्यपींची चालते दंगामस्ती

Parra News : असह्य उकाड्यामुळे आंघोळीसाठी उभो गुणो येथे मोठ्या संख्येने तरुणांचे गट तसेच कुटुंबे येतात. शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी यांची गर्दी मोठी असते.

गोमन्तक डिजिटल टीम

Parra News :

पर्ये, सत्तरीतील मोर्ले - पेळावदा येथून वाहणाऱ्या वाळवंटी नदीवरील ‘उभो गुणो’ या नदीकाठच्या डोहात आंघोळ करायला येणाऱ्या मद्यपी तरुणांच्या वाढत्या दंगामस्ती आणि धांगड धिंगाण्यामुळे या डोहाचे सौंदर्य विद्रूप होत चालले असून या किनाऱ्यावर खुलेआम मद्यपान करणाऱ्या तरुणांना प्रतिबंध करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

असह्य उकाड्यामुळे आंघोळीसाठी उभो गुणो येथे मोठ्या संख्येने तरुणांचे गट तसेच कुटुंबे येतात. शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी यांची गर्दी मोठी असते. येथे येणाऱ्यांत बरेचजण दिवसांचा बेत आखून येतात आणि येताना अन्न पदार्थ, जेवण बनवण्याचे साहित्य, प्लास्टिक पॅकेटबंद खाद्य घेऊन येत असतात.

तसेच यातील तरुणांचे गट सोबत दारूच्या बाटल्या घेऊन येतात. नदी किनारी बसून मद्यपान करत, जेवणे आणि आंघोळ करणे हे प्रकार येथे चालतात. यामुळे या परिसरात गोंगाट, दंगामस्ती आणि कचऱ्याचा खच साचत आहे. त्यामुळे या किनाऱ्याचे सौंदर्य हरपत चालले असून हा परिसर विद्रूप होत आहे.

असह्य उकाड्यामुळे आंघोळीसाठी उभो गुणो येथे मोठ्या संख्येने तरुणांचे गट तसेच कुटुंबे येतात. शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी यांची गर्दी मोठी असते. येथे येणाऱ्यांत बरेचजण दिवसांचा बेत आखून येतात आणि येताना अन्न पदार्थ, जेवण बनवण्याचे साहित्य, प्लास्टिक पॅकेटबंद खाद्य घेऊन येत असतात.

तसेच यातील तरुणांचे गट सोबत दारूच्या बाटल्या घेऊन येतात. नदी किनारी बसून मद्यपान करत, जेवणे आणि आंघोळ करणे हे प्रकार येथे चालतात. यामुळे या परिसरात गोंगाट, दंगामस्ती आणि कचऱ्याचा खच साचत आहे. त्यामुळे या किनाऱ्याचे सौंदर्य हरपत चालले असून हा परिसर विद्रूप होत आहे.

यासंबंधी स्थानिक रहिवासी रेश्मा मोरजकर यांनी सांगितले, की येथे येणाऱ्या बेशिस्त आणि मद्यपी तरुणांची आम्हाला भीती वाटते. दारूच्या नशेत दंगामस्ती करणाऱ्या तरुणांमुळे आम्हाला नदीवर जाता येता येत नाही.

येथूनच मोर्लेत मुख्य रस्त्यावर जाणारी आमची पारंपरिक पायवाट आहे. नदी किनारी तरुणांचे घोळके विचित्र अवस्थेत धांगड धिंगाणा घालीत आंघोळी करीत असल्याने महिला आणि लहान मुलांसाठी फिरणे बंद झाले आहे.

तसेच येथे येणारे तरुण वेगाने गाडी चालतावत आणि रस्त्यावर गाड्या पार्क करतात. त्यामुळे त्याचा त्रास स्थानिकांना होतो. तेव्हा सरकारने त्यावर योग्य उपाय योजना करावी आणि मद्यपींना येथे प्रतिबंध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

दोन्ही पंचायतींनी हटवावा कचरा

उभो गुणो हा डोह एका बाजूने मोर्ले ग्रामपंचायत क्षेत्रात तर दुसऱ्या बाजूने केरी ग्रामपंचायत क्षेत्रात येतो. मोर्लेच्या बाजूने मोर्ले ग्रामपंचायतीतर्फे कचरा टाकू नये असं फलक उभारलेला आहे. पण त्याचा काहीच उपयोग होत नाही.

त्या फलकानुसार कचरा टाकणाऱ्यांना पाच हजारांपर्यंतचा दंड आहे, असे लिहिले आहे. पण त्याचे काहीच पालन होताना दिसत नाही. तेव्हा दोन्ही पंचायतीनीही कचऱ्यांची उचल करावी, अशी मागणी होत आहे.

मद्यपींना प्रतिबंध घालण्याची मागणी

हा किनारा विद्रुप करणाऱ्यामध्ये तरुणांना जास्त समावेश असतो. विविध भागातील तरुण गटाने येथे येतात. सोबत येताना अन्न पदार्थ, दारू आणि संगीत रजनी संच घेऊन येतात. दारू पीत संगीत रजनीच्या तालावर नाचणे आणि दंगामस्ती, हुल्लडबाजी करण्याचे प्रकार तरुणांकडून होतात.

त्यांच्याकडून कचरा फेकणे, दारूच्या काचेच्या बाटल्या फोडणे असे प्रकार होत असतात. अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर प्लास्टिक कचरा नदीत अथवा किनारी भागात टाकणे, असे प्रकारही सर्रासप घडतात. मद्यपींना येथे प्रतिबंध करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

कचऱ्याची वाढती समस्या

या नदीत आणि किनाऱ्यावर प्लास्टिक, दारुच्या बाटल्या, अन्नाचा कचरा याची समस्या वाढत आहे. अशा कचऱ्याने येथे सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. पंचायतीने यावर त्वरित उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

Gold Rate: सोन्याचे दर गगनाल भिडले! सणासुदीच्या काळात खरेदीला ब्रेक; मागणी तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

Margao: देवपूजेची फुले विसर्जनासाठी गेला अन् पाय घसरुन नदीत बुडाला; एक दिवसानंतर सापडला मृतदेह

Goa Live Updates: नीता कांदोळकर यांनी दिला सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा!

सुरतला निघाली, मडगावात पोहोचली; 13 वर्षीय मुलीसोबत नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT