Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

Goa Today's 27 April 2024 Live Update: लोकसभा निवडणूक, राजकारण, गुन्हे, कला, क्रीडा, संस्कृती यासह गोव्यातील ठळक घडामोडींचा आढावा.
Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

24/7 फॉर 2047! मोदींचा नवीन नारा

गेल्या दहा वर्षांत जेवढी काम केलीत हा फक्त ट्रेलर. अजून खूप काही करण्याचे उद्दिष्ट आहे. येणाऱ्या वर्षात 3 कोटी नवीन घरे बांधणार. ज्या गरिबांना घर मिळालं नाही त्यांना 4 जून नंतर नवीन घर बांधून देणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल

सांकवाळ येथील आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्यात आगमन झाले आहे. मोदी दाबोळी विमानतळाच्या आयएनएस हंसा येथे दाखल झाले आहेत.

विरियातो यांची उमेदवार म्हणून उभं राहण्याची लायकी नाही - तानावडे

काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांची उमेदवार म्हणून उभं राहण्याची लायकी नाही. विरियातो यांनी संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांचा अपमान केलाय. खलप विरियातो यांच्या वक्तव्याचे समर्थन करतात की नाही याचे स्पष्टीकरण द्यावे.

बोर्डा महाविद्यालयास स्वायत्त दर्जा

बोर्डा महाविद्यालय स्वायत्त दर्जा प्राप्त करणारे गोव्यातील पहिले शासकीय महाविद्यालय ठरले आहे.

सांकवाळ मोदींची सभा, गर्दीत नऊ वर्षीय मुलगी बेपत्ता

Modi Rally In Goa

सांकवाळ येथे आयोजित नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जमलेल्या गर्दीतून नऊ वर्षीय मुलगी आनंदिता बेपत्ता झाल्याची तक्रार समोर आली आहे. सभेसाठी सुमारे ५० हजार नागरिक उपस्थित असून, आनंदिताला शोधण्यासाठी व्यासपीठावरुन घोषणा करण्यात आली आहे.

जमीन रुपांतरणावर स्पष्ट भूमिका घ्या; काँग्रेस

'गोव्यात होत असलेल्या मोठ्या जमीन रुपांतरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भूमिका स्पष्ट करतील याची गोवा वाट पाहत आहे. गोवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आम्ही गोमंतकीयांना जमीन रुपांतरणावर निर्बंध लादण्याचे वचन दिले आहे,' असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

थिवीत रविवारी तीन तास वीज पुरवठा विस्कळीत राहणार

Power Shutdown in Thivim

थिवीत रविवारी 220kV फिडरच्या दुरुस्ती कामानिमित्ताने पहाटे 4:30 ते सकाळी 7:30 (तीन तास) या काळात आसगाव, वागातोर, हणजूणे, मयडे, नास्नोळा, थिवी, शिरसाई, कामुर्ली आणि कोलवाळ या भागात वीज पुरवठा विस्कळीत राहणार.

म्हापसा येथे बर्निंग कारचा थरार

Burning Car In Mapusa

गिरी म्हापसा येथे थावत्या व्हॅनने अचानक पेट घेतला. यात व्हॅन जळून भस्मसात झाली आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले.

Burning Car In Mapusa
Burning Car In MapusaDainik Gomantak

मांगोर येथे घरफोडी; 2.5 लाखांचे दागिने, रोकड लंपास

Theft In Mangor

मांगोर येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून, चोरट्यांनी सोन्याच्या तीन चैन, मनगटी घड्याळ आणि वीस हजार रुपयांची रोकड लंपास केलीय. पोलिस तपास सुरु.

Theft In Mangor
Theft In MangorDainik Gomantak

मोदीजी एक सौ पचास करोड लायेगा क्या? गोवा काँग्रेसचा सवाल

'पंतप्रधान नरेंद्र मोदी ₹ 150 कोटींचा धनादेश घेऊन येण्याची वाट पाहत आहेत जे गोवा मुक्तिच्या 60 वर्षांच्या स्मरणार्थ ₹ 300 कोटींच्या वचन दिलेल्या रकमेतून प्रलंबित आहेत. जर पंतप्रधान ही रक्कम आणण्यात अयशस्वी झाले, तर आशा आहे की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अर्थमंत्र्यांचे आभार माघारी घेतील,' असा सवाल काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणूक! गोवा पोलिसांकडून तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी

Goa Police

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांकडून विविध तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

मोदी कळसा भंडुरा प्रकल्पाची मान्यता काढून घेणार का?

'गोव्याची जीवनदायीनी आई म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटकच्या कळसा भांडुरा प्रकल्पाला दिलेली मंजुरी मागे घेण्याच्या अधिसूचनेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोव्यात येण्याची गोमंतकीय वाट पाहत आहेत', काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांची एक्सवर पोस्ट.

गोव्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

PM Modi In Goa

पल्लवी धेंपे आणि श्रीपाद नाईक यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आज गोव्यात भव्य सभेला संबोधित करतील. राज्यभरातून सभेला ५० हजाराहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता भाजपने व्यक्त केली जात आहे.

PM Modi In Goa
PM Modi In GoaDainik Gomantak

पर्वरी येथे मराठी राजभाषा साहित्य संमेलनास सुरुवात

'मराठी असे आमुची मायबोली' व 'गोमंतक मराठी अकादमी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी राजभाषा संमेलनाचे महाकवी सुधाकर गायधनी यांच्या हस्ते पर्वरी येथे उद्घाटन. श्री. सातेरी महामाया दिंडी पथकाच्या ग्रंथदिंडी मिरवणुकीने संमेलनास सुरुवात. दिवसभर विविध कार्यक्रम.

मराठी राजभाषा संमेलन
मराठी राजभाषा संमेलनDainik Gomantak

मानसिक त्रासात झारखंडच्या कामागाराने संपवले जीवन

Goa Crime News

मासेमारी बोटीवर काम करणाऱ्या आनंद बारा (35, मूळ झारखंड) याची सावंतवाडो, बागा येथे राहत्या घरी आत्महत्या. रूममेटच्या मते आनंद अनेक दिवसांपासून मानसिक त्रासात होता. कळंगुट पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com