Parra  Dainik Gomantak
गोवा

Parra News : गरीब, वंचित, गरजू व्यक्तींना मदत करा :नमन सावंत

Parra News : निरंकाल येथे विद्यार्थी निरोप समारंभ उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Parra News :

पर्ये, आपण जन्माला आल्यापासून मोठे होई र्यंत आपल्या जडणघडणीत सतत इतरांची मदत होत असते.

आरोग्य सेवा, शाळा, रस्ते किंवा वाहतूक व्यवस्था या सोयी सुविधा कोणी तरी आपल्यासाठी निर्माण केल्या आहेत, त्याचे सदैव भान ठेवून गरीब, वंचित, गरजू व्यक्तींना मदत करण्याची वृत्ती आपण बाळगावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या नमन सावंत यांनी केले.

शिग्नेव्हाळ, निरंकाल येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता चौथीच्या मुलांचा निरोप समारंभ नुकताच पार पाडला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बेतोडा-निरंकालचे सरपंच मधू खांडेपारकर, पंच गीता गावडे, संवेदन केंद्राचे उपाध्यक्ष दिनेश सावंत, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्‍वेता गावडे, संवेदन केंद्राचे कातकरी प्रकल्प समन्वयक दशरथ मोरजकर, प्रशिक्षक बाबनी मापारी, मुख्याध्यापिका आर्या नाईक, शिक्षिका प्रिया नाईक आदी उपस्थित होते.

सरपंच मधू खांडेपारकर यांनी कातकरी महिलांनी आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच त्यांनी आपला समाज व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापिका आर्या नाईक यांनी संवेदन केंद्रातर्फे आपल्या विद्यालयात मागच्या दोन महिन्यांपासून सतत मुलांसाठी विविध आनंददायी शिक्षण आणि मुलांचे जीवन कौशल्ये विकासासाठी सातत्याने विविध कार्यक्रम राबविल्याने त्याचा फायदा आपल्या मुलांना झाल्याचे सांगितले.

यावेळी चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. संवेदन केंद्र आणि पालक शिक्षक संघातर्फे त्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आर्या नाईक यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक व कातकरी पालक उपस्थित होते.

तत्पूर्वी संवेदन केंद्राचे प्रशिक्षक बाबनी मापारी आणि समन्वयक दशरथ मोरजकर यांनी मुलांना आनंददायी कृतियुक्त शिक्षणातून जीवन कौशल्यांची ओळख करणारा कार्यक्रम घडवून आणाल. यात विविध खेळ, गाणी व कृतियुक्त उपक्रम राबवून मुलांना काही जीवन कौशल्यांची ओळख करून केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

मडगाव रेल्वे स्टेशनवर दोन भीषण अपघात! धावत्या ट्रेनमध्ये चढताना एकाचा मृत्यू; Watch Video

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

Ind vs Aus 2nd ODI: सचिन-विराटलाही जमला नाही 'तो' कारनामा केला, चौकार मारुन रचला इतिहास; कांगारुंच्या भूमीवर हिटमॅनचा रेकॉर्डब्रेक फॉर्म VIDEO

SCROLL FOR NEXT