Fishing In Goa: गोव्यात कर्नाटक, महाराष्ट्रातील बोटींचा शिरकाव; पारंपरिक मच्छीमारांना मासळीचा तुटवडा

Fishing In Goa: महाराष्ट्र व कर्नाटकातील मच्छीमार बोटी येत असल्यामुळे आम्हाला मासळी मिळत नाही. त्याच्या बोटीला एलईडी लाइट असते, त्यामुळे मासळी दूर पळते.
Fishing In Goa
Fishing In GoaDainik Gomantak

कर्नाटक व महाराष्ट्रातील मच्छीमार आपल्या बोटी घेऊन गोव्याच्या सागरी हद्दीत मासळी पकडत असल्यामुळे गोव्यातील येथील पारंपरिक मच्छीमारांना मुबलक मासळी मिळत नसल्याचा दावा बाणावली येथील मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी केला.

आम्ही पहाटे पाच-साडेपाचच्या दरम्यान समुद्रात जातो. परंतु साडेतीन तासानंतरही केवळ अर्ध पाटला मासळी मिळते. त्यामुळे जिवन कसे जगावे हा प्रश्न सध्या आमच्या समोर असल्याचे पेले यांनी सांगितले.

पूर्वी तीन साडेतीन तासांमध्ये आम्हाला बांगडा, लेपो, सुंगटे आदी सात आठ पाटली मासळी मिळायची. पण महाराष्ट्र व कर्नाटकातील मच्छीमार बोटी येत असल्यामुळे आम्हाला मासळी मिळत नाही. त्याच्या बोटीला एलईडी लाइट असते, त्यामुळे मासळी दूर पळते.

या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहे. पोलिसांना, कॅप्टन ऑफ पोर्टस, मच्छीमारी खात्याला बोटी घेऊन द्याव्यात अशी विनंती केली आहे, परंतु अजून त्या संदर्भात काहीही झालेले नाही, असे पेले यांनी सांगितले.

Fishing In Goa
Smart City Panjim: ‘स्मार्ट’ कामांतील अडसर होणार दूर; ‘ती’ दोन झाडे हटवण्यास परवानगी

इतर राज्यातील बोटी आल्या आहेत अशी तक्रार केल्यावर तास, दीड तासाने पोलिस वगैरे येतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. तसेच या भागातील पर्यटन मौसम तर संपल्यातच जमा आहे. पर्यटक जास्त येत नाहीत. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स देखील बंदच आहे असेही पेले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com