Goa CM Pramod Sawant And Students Dainik Gomantak
गोवा

Pariksha Pe Charcha 2025: परीक्षा एक उत्सव! गोव्यात मुख्यमंत्र्यांसह 800 विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम

Goa CM Pramod Sawant: मोदींनी केलेली चर्चा व विविध पैलूंवर केलेले मार्गदर्शन आजच्या विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी लाभदायी ठरणार; मुख्यमंत्री सावंत

गोमंतक ऑनलाईन टीम

साखळी: 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा ही येणाऱ्या पिढीसाठी व विकसित भारतासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

परीक्षा म्हणजे ताण घेण्याचा क्षण नसून तो एक उत्सव आहे. त्यांचा संदेश विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती नष्ट करणारा आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमावेळी व्यक्त केले. साखळी रवींद्र भवनात मुख्यमंत्र्यांनी सुमारे ८०० विद्यार्थ्यांसह हा 'लाईव्ह' कार्यक्रम पाहिला.

साखळीच्या नगराध्यक्ष सिध्दी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, शिक्षण संचालक शैलेंद्र शिंगडे, उपसंचालक मनोव साचईकर, साखळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिगुलकर, गोवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रुपेश ठाणेदार, भाग शिक्षणाधिकारी लीना कळंगुटकर, भाजप उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर व इतरांची उपस्थिती होती.

अनोखी संकल्पना

'परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची ही आठवी आवृत्ती असून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणासाठीच प्रेरित व उत्साहीत न करता सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या परीक्षांसाठी आत्मविश्वास देणे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना व कल्पकता सर्वात अनोखी महत्वाची आहे.

त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांशी केलेली चर्चा व विविध पैलूंवर केलेले मार्गदर्शन आजच्या विद्यार्थ्यांना तणावातून बाहेर काढण्यासाठी लाभदायी ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT