Gayatri Marathe Murder Trial: मग गायत्री मराठे यांचा खून कोणी केला? तपास, पुरावे सादर करण्यात गोवा पोलिस फेल

Gayatri Marathe Murder Court Trial: संशयितांचा चोरीचा उद्देश होता तर त्यांनी साहित्याची चोरी का केली नाही? असे निरीक्षण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पॉल यांनी नोंदवले.
Gayatri Marathe Murder Court Trial
Gayatri Marathe Murder Court TrialDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गायत्री मराठे खून प्रकरणाचा खटला आरोप निश्चित करताना न्यायालयात टिकू शकला नाही. खूनाचा तपास व्यवस्थित झाला नाही, वरिष्ठांनी यात आवश्यक तेवढं लक्ष घातलं नाही. खूनाचे कारण पोलिस सिद्ध करु शकले नाहीत. आणि केवळ सीसीटीव्हीवर विसंबून राहत संशयितांची ओळख परेड घेतली नाही, असा ठपका न्यायालयाने गोवा पोलिसांवर ठेवला आहे.

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित व्यवस्थित दिसत नाहीत. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी अभियोजन संचालनालयाचे मत घेतले नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात संशयितांनी चोरीच्या उद्देशाने कपाटाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असा दावा करण्यात आला आहे. पण, प्रत्यक्षात कपाटाचे दर बंद असल्याचे आढळून आले आहे.

Gayatri Marathe Murder Court Trial
Goa Opinion: पूर्वी बांबोळीमार्गे पणजीला जाताना हिरवेगार डोंगर दिसायचे आणि आता? 'सिमेंटचे जंगल करू नका' हा सल्ला नव्हे इशारा

तसेच, संशयितांचा चोरीचा उद्देश होता तर त्यांनी साहित्याची चोरी का केली नाही? असे निरीक्षण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शेरिन पॉल यांनी नोंदवले. संशियतांनी चोरी केल्याचा कोणताच पुरावा नाही. तसेच, खूनाचे कारण देखील सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने पुढे म्हटले आहे. मृत महिला एकटी राहते याची माहिती काढण्यासाठी संशयितांनी घराची रेकी केल्याचा देखील पुरावा नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

साक्षीदारांना दाखवण्यात आलेले फोटो संशयितांचे आहेत असं म्हटलं तर त्यांनी केवळ संशयितांना पाहिलं म्हणून खूनी ठरवता येत नाही. कारण, साक्षीदारांनी संशयितांना घरात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना पाहिलं नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गायत्री यांच्या घराचा मुख्य दरवाजा खुला होता तर आतील दरवाजा बंद होता. बेल वाजवली असता आतून गायत्री यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

Gayatri Marathe Murder Court Trial
Goa Accident: गोव्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना सरकारचा दिलासा; भरपाई योजनेअंतर्गत मिळणार लाखो रुपयांची मदत

साडे अकरा वाजता गायत्री यांच्या घराजवळ किंवा घरात काय घडलं? याबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज सादर केलेले नाहीत. खोली आतून बंद असल्याने याच वेळी गायत्री यांचा खून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com