Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : पालक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यावेत! प्रा. अनिल सामंत

Prof. Anil Samant : ऊर्जा फाऊंडेशनचा पेडणे तालुका शिष्यवृत्ती प्रदान सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे, पालक आणि शिक्षकांनी आधी विद्यार्थ्यांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न करावेत, ज्यामुळे मुलांना मानसिक आधार मिळेल. तसेच त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची मुभा द्यावी,असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले.

ऊर्जा फाऊंडेशनच्या संत सोहिरोबानाथ आंबिये कॉलेजच्या सभागृहात आयोजित पेडणे तालुका शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे यानात्याने बोलत होते. यावेळी

प्रा. अविनाश पाटील, ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक दुर्गादास परब, सदस्य विठ्ठल प्रभुदेसाई , राजेंद्र बोंद्रे हे उपस्थित होते.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण खूपच उपयुक्त असून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करेल, असा आशावादही सामंत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला डॉ. देविदास शिरोडकर, जीवन आनंद संस्थेचे विश्‍वस्त पारिश खानोलकर तसेच अनेक दाते उपस्थित होते.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण खूपच उपयुक्त असून विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करेल, असा आशावादही सामंत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला डॉ. देविदास शिरोडकर, जीवन आनंद संस्थेचे विश्‍वस्त पारिश खानोलकर तसेच अनेक दाते उपस्थित होते.

प्रा. अविनाश पाटील म्हणाले की, मोबाईल आणि सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केल्यास शिक्षणात खूपच उपयोग होऊ शकतो.

दुर्गादास परब यांनी स्वागत केले. पेडणे तालुक्यातील दहावीत शिकत असलेल्या एकूण १०५ गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार रु. प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. एकूण सात तालुक्यातील ५२४ विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले.

मुख्य कार्यक्रमाअगोदर पेडण्याचे सुपूत्र जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे अग्रगण्य उद्योजक निरंजन निगळ्ये यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी मुलाखत मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे यांनी घेतली. राजेंद्र बोंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा गावडे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: अक्षय खन्नावर पाकिस्तान फिदा! 'FA9LA' हुकस्टेपचा बलुची पोरांना फीव्हर; फॅनबेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

VIDEO: चालत्या कारला केलं लक्ष्य, बॉम्ब थेट गाडीवर आदळला, 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टरमाईंड 'राद साद' ठार; इस्रायली सैन्याने हवाई हल्ल्यात घेतला बदला

'गोव्यात हफ्ता दिल्याशिवाय धंदा चालत नाही', रोमिओ लेन दुर्घटनेवरून केजरीवालांचा भाजप सरकारवर हल्ला

IND vs SA: अभिषेक शर्मा बनणार टीम इंडियाचा नवा 'रन मशीन'! किंग कोहलीचा 9 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड धोक्यात; कराव्या लागणार 'इतक्या' धावा

Goa Weather: पारा घसरला! थंडीची लाट कायम, पूर्वेकडील वाऱ्यांमुळे दुपारच्या वेळीही घरांमध्ये गारवा

SCROLL FOR NEXT