Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Education: एप्रिलमध्ये शाळा म्हणजे मुलांच्या जीवाशी खेळ, परीक्षेनंतर पालकांची मोठी सभा घेणार; रॉड्रिग्ज यांचा इशारा

New Academic Year: रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, उष्णतेची तीव्रता वाढत असताना शाळा एप्रिलमध्ये सुरू करण्याचा निर्णय म्हणजे मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे पाऊल आहे.

Sameer Panditrao

पणजी: एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध करत पालक प्रतिनिधी सिसिल रॉड्रिग्ज यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शाळा नियोजित वेळेनुसार एप्रिलमध्येच सुरू होतील, असे स्पष्ट केले होते.

मात्र, हा निर्णय बालकांच्या आरोग्यास धोकादायक ठरेल, असा आरोप रॉड्रिग्ज यांनी केला आहे. दरम्यान, शाळेतील परीक्षा संपल्यावर पालकांना घेऊन मोठी सभा घेणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, उष्णतेची तीव्रता वाढत असताना शाळा एप्रिलमध्ये सुरू करण्याचा निर्णय म्हणजे मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे पाऊल आहे.

या निर्णयामुळे अनेक पालक अस्वस्थ आहेत आणि त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री मुलांच्या जीवाशी खेळत आहेत, असेच हे पाऊल आहे.

रॉड्रिग्ज यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील मुख्याध्यापकांची संघटनाही या निर्णयाविरोधात आहे. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या तोंडी माहिती आहे की, मुख्याध्यापक संघटनांनीही शाळा एप्रिलमध्ये सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे. आम्ही अधिकृत कागदपत्र मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला असून, लवकरच त्याचे निष्कर्ष समोर येतील.

हा तर व्यवस्थापनाच्या तयारीला धक्का

शिक्षकांसाठी सध्या प्रशिक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीत एप्रिलमध्ये शाळा सुरू करणे म्हणजे व्यवस्थापनाच्या तयारीला धक्का बसणार आहे. अनेक मुख्याध्यापक आणि पालक-शिक्षक संघटनांनीही आपले आक्षेप नोंदवले आहेत. शाळा व्यवस्थापनांनीही या निर्णयावर आपली हरकत नोंदवली आहे. उष्णतेमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, शाळा जूनमध्ये सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे, असेही सिसिल रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT