Goa Education: पुन्हा बदल! पहिली ते पाचवीचे वर्ग जूनपासूनच सुरू होणार; पालकांच्या याचिकेवरील सुनावणी 24 मार्च रोजी

New Academic Year Goa: यापूर्वी ७ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि नववीपर्यंतचे वर्ग सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच भरवण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते.
Goa Education
Goa EducationDainikGomantak
Published on
Updated on

New Education Policy Goa

पणजी: राज्य सरकारने पहिली ते पाचवीचे वर्ष जून महिन्यामध्येच सुरू करण्याचे ठरविले आहे. यापूर्वी ७ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि नववीपर्यंतचे वर्ग सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच भरवण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते.

सरकारने शैक्षणिक वर्षात बदल करण्याचा निर्णय घेताना कोणताही अभ्यास केला नाही आणि संबंधितांना त्याची पूर्वकल्पनाही दिली नाही, असा पालकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. त्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली.

Goa Education
Goa Education: शैक्षणिक वर्षाबद्दल नवीन अपडेट! हरकती नोंदवण्यासाठी वाढवली मुदत; संचालनालयाचा निर्णय

खंडपीठाने आज नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सोमवार, २४मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे.

सुनावणीदरम्यान आज राज्य सरकारने न्यायालयाला माहिती दिली, की गोवा शिक्षण अधिनियमांतर्गत नवीन मसुदा नियम जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीचे शैक्षणिक सत्र जूनपासून सुरू होईल. इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे शैक्षणिक सत्र ७ एप्रिलपासून सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com