Goa New Academic Year Dainik Gomantak
गोवा

New Academic Year: एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष नको! पालकांच्या 10 हजार हरकती संचालनालयात दाखल; छाननीनंतर होणार निर्णय

Goa Education: एकाच दिवशी शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात सुमारे अडीच हजारांहून अधिक हरकती स्वीकारण्यात आल्या.

Sameer Panditrao

Goa school academic year: इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्‍या (अकरावी वगळता) विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू करण्याच्या निर्णयाला राज्यातील सुमारे दहा हजार पालकांनी हरकती घेतल्या आहेत. यासंबंधीच्या पत्रांचा ढिगारा शिक्षण संचालनालयात दाखल झाला आहे.

आज एकाच दिवशी शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात सुमारे अडीच हजारांहून अधिक हरकती स्वीकारण्यात आल्या. सहा हजारांहून अधिक हरकती इमेलच्या माध्यमातून पाठविण्यात आल्या आहेत. या निर्णयाविरोधात राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून १३ हजारांहून अधिक पालकांनी सह्या केल्याची माहिती समोर आली आहे.

शिक्षण संचालनालयाने राजपत्रात अधिसूचना जारी करून एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास कुणाच्या हरकती किंवा सूचना असल्यास नोंदविण्यासाठी २७ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार राज्यभरातील हजारो पालकांनी, काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी इमेलच्या माध्यमातून सूचना तसेच हरकती नोंदविल्या आहेत. ईमेलद्वारे हरकती किंवा सूचना नोंदवलेल्या पालकांना ईमेल स्वीकृत (सीसी) केल्याची माहिती मिळाली.

शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

सुमारे दहा हजार सूचना तसेच हरकती शिक्षण संचालनालयात दाखल झाल्या आहेत. या सर्व पत्रांची छाननी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT