Goa Private School Fees: गतवर्षी राज्यातील विनाअनुदानित 6 शाळांकडून शुल्कवाढ नाही! 1 लाखाहून अधिक शुल्क आकारणाऱ्या 3 शाळा

Goa School Fees Increase: एकूण ५६ विनाअनुदानित शाळा असून, त्यात सहा शाळांनी २०२४-२५ वर्षी कोणतीही शुल्कवाढ केलेली नाही.
New academic year goa
Goa Education NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa education: राज्यातील विनाअनुदानीत शाळांना १० ते १५ टक्के शुल्क आकारण्यास परवानगी दिली गेली आहे. एकूण ५६ विनाअनुदानित शाळा असून, त्यात सहा शाळांनी २०२४-२५ वर्षी कोणतीही शुल्कवाढ केलेली नाही. त्याशिवाय यातील तीन शाळा सर्वात जास्त म्हणजे १ लाख रुपयांहून अधिक शुल्क आकारणाऱ्या आहेत. तर ५० हजार ते १ लाख रुपयांच्या आतमध्ये शुल्क आकारणाऱ्या १३ शाळा आहेत.

काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी विनाअनुदानित शाळांच्याविषयी लेखी प्रश्नावर मागितलेल्या उत्तरावर शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर दिले असून, त्यात वरील माहिती स्पष्ट केली आहे. या उत्तरात अधिक शुल्क आकारल्याबद्दल कोणत्याही शाळेविरुद्ध तक्रार आलेली नाही.

विनाअनुदानित शाळांना प्रत्येक वर्षी १० ते १५ टक्के शुल्कवाढ करण्याची परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार व्यवस्थापन समिती आणि पालक-शिक्षक समितीचे प्रतिनिधी बैठक घेऊन ते शुल्क ठरवतात, असेही म्हटले आहे.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शुल्क आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळांच्या नावांसह वार्षिक शुल्कवाढीची आकडेवारी उत्तरात दिली गेली आहे. त्यात महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या मार्गदर्शनाखाली ताळगावच्या सेंट मायकल, त्याशिवाय कांपाल-पणजी येथील बाल भवन, मडगाव येथील अँथनी हायस्कूल, काणकोणच्या श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालय, कोलवाळ-बार्देशचे श्री राम विद्यामंदिर आणि कदंब पठारावरील गेरा स्कूल या व्यवस्थापनाने गतवर्षी शुल्कवाढ केलेली नाही.

New academic year goa
Goa Education: शाळा 'एप्रिल'मध्येच सुरु होणार! पालकांची याचिका निकाली; राज्य सरकारचा मार्ग मोकळा

नारायण बांदेकर शाळेकडून कमी शुल्कवाढ

गेरा स्कूलने २०२३-२४ मध्ये २ लाख ३८ हजार ८८० रुपये शुल्क आकारले होते, २०२४-२५ मध्ये ते कमी करण्यात आल्याचे रकमेवरून दिसून येते. या शाळा व्यवस्थापनाने मागील वर्षी २ लाख ११ हजार ५४६ रुपये शुल्क आकारल्याचे दिसून येते.

New academic year goa
Goa Education: 'शालेय फी'बाबत महत्वाची बातमी! शुल्कवाढीसाठी परवानगी आवश्‍यक; शाळा सुरू करण्यास अजून काहींचा विरोध कायम

झुआरीनगर येथील भारतीय विद्या भवनची नारायण बांदेकर शाळा ही सर्वात कमी शुल्कवाढ करणारी शाळा ठरली. या शाळेने केवळ ६० रुपये शुल्कवाढ केली आहे, तर गतवर्षी जास्त शुल्क आकारणी करताना मिरामार येथील शारदा मंदिर शाळने ११ हजार २०० रुपये शुल्कवाढ केल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com