Goa IFFI Festival 2022 Dainik Gomantak
गोवा

Curfew Order During IFFI 2022: इफ्फीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू; जमावबंदीसह गोव्यात आणखी कोणते निर्बंध वाचा सविस्तर

राजधानी पणजीत पोलिस प्रशासनाने दिले आदेश

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात आता 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची रंगत वाढू लागली आहे. येत्या काही दिवसातच हा कार्यक्रम राजधानी पणजीत सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासन ही सतर्क झाले असून राजधानी पणजी तसेच आग्शी हद्दीमध्ये पोलिस प्रशासनाने नवे आदेश लागू केले आहेत. हे निर्बंध 19 नोव्हेंबर पासून ते 28 नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहेत.

(Panjim Police issued new restriction in Panjim city for 53rd iffi)

मिळालेल्या माहितीनुसार आज पणजी पोलिसांनी कलम 144 लागू केले आहेत. याचा हेतू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यात आला असल्याचं पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.

पुढील निर्बंध लागू

  • पाच किंवा अधिक व्यक्तींची सभा आणि एकत्र येणे आणि मिरवणुका काढणे.

  • लाठी, तलवारी, खंजीर किंवा भाले यासारख्या गुन्ह्यांसाठी बंदुक किंवा शस्त्रे बाळगण्यासाठी निर्बंध लागू असणार आहेत

  • लाउडस्पीकरचा वापर करण्यास निर्बंध असतील

  • कोणत्याही कार्यक्रमांमध्ये घोषणाबाजीला निर्बंध लागू असतील

पणजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमा ठिकाणाभोवती तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीगत कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. मात्र लग्न, अंत्ययात्रा अथवा विशेष कार्यक्रम प्रसंगी हा आदेश लागू होणार नाही. मात्र इतर व्यक्तीगत कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहेत.

नवा आदेश हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या परिसरातील मुख्य रस्ता, चौक, यांपासून 500 मीटर त्रिज्येतील कोणत्याही मोकळ्या जागेत व्यक्तीगत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही. चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात देश - विदेशातून अतिथी हजेरी लावणार आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणता ही अनुचीत प्रकार घडू नये. या उद्देशाने हे निर्बंध घातले गेल्याचे पणजी पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT