Ajay Devgan Surprise In Iffi: इफ्फीत अजय देवगणचे चाहत्यांसाठी खास गिफ्ट, स्वत: राहणार उपस्थित

इफ्फीदरम्यान 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार उपस्थित राहणार आहेत.
Ajay Devgan Surprise In Iffi
Ajay Devgan Surprise In IffiDainik Gomantak

53rd Edition Of Iffi In Goa: पणजी, गोवा येथे 20 नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू होत आहे. इफ्फीत 79 देशांतील 280 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. तर, इफ्फीदरम्यान 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार उपस्थित राहणार आहेत. सिनेकलाकार अजय देवगण देखील या महोत्सवासाठी उपस्थित राहणार असून, त्याने आपल्या चाहत्यांसाठी अजून एक खास गिफ्ट देणार असल्याचे सांगितले आहे.

Ajay Devgan Surprise In Iffi
Iffi Goa: इफ्फीकडून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा गौरव; दाखवले जाणार तीन जुने चित्रपट

अजय देवगणच्या गाजलेल्या दृश्यम या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्राईम आणि त्याभोवती फिरणारा सस्पेन्स अशी या सिनेमाची कथा आहे. दृश्यमचा पहिला भागाला प्रेक्षकांची खूप प्रिसिद्धी मिळाली होती. त्याचाच पुढचा भाग आता प्रदर्शनाला सज्ज झाला आहे. या भागात देखील पहिल्या भागासारखाच सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. तसेच, संपूर्ण कथानक पणजी, गोवा भोवती फिरणारे असल्याने या चित्रपटाचे गोव्याशी खास कनेक्शन आहे.

Ajay Devgan Surprise In Iffi
Amy Aela: कतरिनाची डुप्लिकेट एमीचा कहर लूक

अजय देवगणने नुकतेच दृश्यम-2 या चित्रपटाचा प्रीमियर गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाणार आहे. तसेच, या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी तो स्वत: उपस्थित राहणार असल्याची त्याने माहिती दिली आहे. "दृश्यम-2 यावर्षाचा बहूप्रतिक्षित चित्रपट आहे, तुम्ही सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहात. दृश्यम-2 इफ्फीत प्रीमियर होणार असून, आपण सर्वजण सोबत हा चित्रपट पाहू, भेटूया गोव्यात." असे अजय देवगणने म्हटले आहे.

Ajay Devgan Surprise In Iffi
Global Plastic Convention In Goa: गोव्यात जागतिक प्लास्टीक परिषदेचा शुभारंभ; 250 उद्योगसमूहांचा सहभाग

दरम्यान, इफ्फीसाठी अजय देवगण शिवाय सुनील शेट्टी, वरुण धवन, क्रिती सानोन, प्रभूदेवा, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, शेखर कपूर, राणा डगुबत्ती, मणिरत्नम, ए आर रेहमान, पंकज त्रिपाठी, परेश रावल, अक्षय खन्ना, कलकी कोचलेन, यामी गौतमी, दीनेश विजन, इलियाना डिक्रूज, आर. बाल्की, अनुपम खेर यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. याशिवाय 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार उपस्थित राहणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com