CM Pramod Sawant: "देशहित, राज्यहित आणि मग वैयक्तिक हित!" मुख्यमंत्र्यांनी मांडले सुशासनाचे 'सप्तपदी' सूत्र; पुढील संकल्प काय?

cm pramod sawant completes 7 years goa governance: कोणताही निर्णय घेताना सर्वप्रथम देशहित, त्यानंतर राज्यहित, पक्षहित आणि शेवटी वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले.
cm pramod sawant completes 7 years goa governance
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोणताही निर्णय घेताना सर्वप्रथम देशहित, त्यानंतर राज्यहित, पक्षहित आणि शेवटी वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले. यापुढेही याच सूत्रावर राज्यकारभार चालवणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर १९ मार्च २०१९ रोजी मध्यरात्रीनंतर डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सलग सात वर्षे ते या पदावर कार्यरत आहेत.

या प्रवासाचा उल्लेख करताना सावंत म्हणाले, भाईंच्या निधनानंतर पक्षाने माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. त्यावेळी राज्यासमोर अनेक आव्हाने होती. देश व राज्यहिताला प्राधान्य देत ती सोडवण्याचा प्रयत्न केला. लोकांचे प्रश्‍‍न सोडवण्यासाठी सातत्याने काम करत राहिलो. त्यामुळे किती वर्षे झाली याची जाणीवही झाली नाही असे सांगून त्यांनी या संधीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत विकास आणि सुशासनावर भर दिला.

cm pramod sawant completes 7 years goa governance
CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

२०१९ नंतर प्रशासनात स्थैर्य राखत पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. रस्ते, पूल आणि शहरी विकास प्रकल्पांना गती देण्यात आली. प्रमुख शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन आणि डिजिटल सुविधा उभारण्यात आल्या.एकूणच विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीवर आधारित मुख्‍यमंत्री राज्याला प्रगतीच्या दिशेने नेत असल्याचे दिसून आले.

प्रत्‍येक क्षेत्रात साधली प्रगती

शिक्षण क्षेत्रात शासकीय शाळांचे आधुनिकीकरण, ई-लर्निंगचा प्रसार आणि विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवण्यात आल्या. आरोग्य क्षेत्रात कोविड काळातील व्यवस्थापन हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे उदाहरण ठरले. निर्बंधांची अंमलबजावणी, लसीकरण मोहीम आणि आरोग्य सुविधांचा विस्तार यामुळे राज्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. गोवा मेडिकल कॉलेजसह आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावरही भर देण्यात आला. पर्यटन आणि रोजगारनिर्मितीसाठी स्टार्टअप धोरण, कौशल्य विकास कार्यक्रम आणि उद्योगांना प्रोत्साहन देणारे निर्णय राबवण्यात आले.

cm pramod sawant completes 7 years goa governance
CM Pramod Sawant: नोकरीसाठी पहिली संधी अनाथ मुलांना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

भाजपने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. पक्षाच्या विचारसरणीनुसार ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यापुढेही त्याच विचारांवर वाटचाल करत राहीन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com