Vicky Kaushal New Movie: विकीचा 'हा' चित्रपट थेट ओटीटीवर येणार

निर्माता करन जोहरसह विकीने स्वतःचे केली घोषणा
Vicky Kaushal
Vicky Kaushal Dainik Gomantak

Vicky Kaushal New Movie: 'उरी' या चित्रपटानंतर अभिनेता विकी कौशलची फॅन फॉलोविंग देशभरात मोठ्या प्रमाणात वाढली. त्याच्या अभिनयाचे कौतूक तर 'मसान'पासूनही होत आले आहे. त्यानंतर अभिनेत्री कॅटरिना कैफशी लग्नापासुन विकी आणखी जास्त चर्चेत आला. आता त्याच्या नव्या चित्रपटाबाबतची एक अपडेट समोर आली आहे.

Vicky Kaushal
Ajay Devgan Surprise In Iffi: इफ्फीत अजय देवगणचे चाहत्यांसाठी खास गिफ्ट, स्वत: राहणार उपस्थित

अभिनेता विकी कौशलचा आगामी चित्रपट 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाची घोषणा होऊन खूप काळ लोटला आहे. या चित्रपटाची खूप उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. तथापि, विकी आणि निर्माता करन जोहर यांनी हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलीज होणार असल्याचे सांगितले आहे.

विकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये विकी करन जोहरसोबत दिसतो. दोघेही अत्यंत मजेशीरपणे गप्पा मारताना दिसतात. त्यात करन विकीला या चित्रपटाबाबत बोलत असतो. विकीने या चित्रपटात त्याची भुमिका कशी असेल, याचीही माहिती दिली आहे. तर 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर रीलीज होणार आहे. तथापि, हा या चित्रपटाची रीलीज डेट मात्र अद्याप जाहीर केली गेलेली नाही.

Vicky Kaushal
Amitabh Bachchan Viral Tweet: हे मोठे होतात, मग सोडून जातात; जिवलग मित्राच्या मृत्युनंतर बिग बी यांची भावना

या चित्रपटात विकी एका डान्सरच्या भुमिकेत दिसणार आहे. अनेकांना हा चित्रपट बॉलीवुड अभिनेता गोविंदाचा बायोपिक असल्याचे वाटत होते. पण करन जोहरने या व्हिडिओत ही गोष्ट नाकारली आहे. एका सामान्य डान्सरची कहाणी यात असल्याचे करनने सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान याने केले आहे. चित्रपटात भूमी पेडणेकरसह कियारा आडवाणी यांच्याही महत्वाच्या भुमिका असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com