Panjim Municipal Market Goa Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipal Market: महापालिका मार्केटमधील भाडेकरार नव्या वर्षात तरी होणार का?

Panjim Municipal Market: महापालिका मार्केटमधील दुकानगाळे मालकांशी भाडेकराराला यावर्षीही मुहूर्त मिळालेला नाही.

दैनिक गोमन्तक

Panjim Municipal Market: महापालिका मार्केटमधील दुकानगाळे मालकांशी भाडेकराराला यावर्षीही मुहूर्त मिळालेला नाही. आता नव्या करारासाठी पालिका संचालनालयाकडून मंजुरी येत नाही, तोपर्यंत महापालिकेला हात बांधून बसावे लागणार आहे. करारासाठी जी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती, ती घेण्यात महापालिका मंडळ पुरते अपयशी ठरले आहे. त्यामुळे दरमहा लाखो रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत येणार होता, त्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मार्केटचा ताबा महापालिकेच्या ताब्यात दिला, त्यापूर्वी या इमारतीची जागा आरोग्य खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिका अशा तीन सरकारी यंत्रणांच्या ताब्यात होती. त्यामुळे महापालिकेला दुकानगाळ्यांचे भाडेकरार करता येत नव्हते. पर्रीकर हे केंद्रातून येऊन पुन्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी या जागा मालकीचा वाद सोडविला होता.

तत्कालीन महापौर उदय मडकईकर आणि बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनी भाडेकराराला मूर्त स्वरूपही दिले. करार मार्गी लागणार तोच मार्केट टेन्ट असोसिएशनने आडकाठी आणली. करारात काही त्रुटी असल्याचे सांगत तो पुढे ढकलला गेला, तो आतापर्यंत. करारात काही बदल करत महापालिकेने तो मंजुरीसाठी पालिका संचालनालयाकडे पाठविला आहे.

नावांच्या यादीचे त्रांगडे कायम

याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दुकानदारांनी करार करण्यासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरली आहे. ज्यांनी गाळे खरेदी केले आहेत, त्यांनी ती रक्कम भरली. परंतु गाळे खरेदी करणाऱ्याचे नाव गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या यादीत नाही. जीएसआयडीसीच्या यादीनुसार गाळ्याची मालकी असेल तर त्यांचे करार करण्यास महापालिका उत्सुक आहे, परंतु खरेदीदारांची अडचण होऊन बसली आहे.

जानेवारीत करार शक्य!

महापालिकेने लीज करारातील काही त्रुटी दूर करून तो पालिका संचालनालयाकडे पाठविला आहे. त्या कराराच्या मसुद्याला जानेवारीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मान्यता मिळाल्यास तत्काळ भाडेकरार करण्यास महापालिका सुरुवात करणार आहे, असे बाजार समितीचे अध्यक्ष बेंटो लॉरेन यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT