Goa Tourist Crime : कोलव्यात रशियन नागरिकाकडून सॅटेलाइट फोनचा वापर; फोन जप्त करत गुन्हा दाखल

पोलिसांनी त्याच्यावर इंडियन वायरलेस अँड टेलिग्राफ अॅक्ट आणि इंडियन टेलिग्राफी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Goa Tourist Crime
Goa Tourist CrimeDainik Gomantak

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणजे गोव्यात सनबर्नवेळी अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यावेळी अनेकांचे स्मार्टफोन चोरीला गेले. या दिवसात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

Goa Tourist Crime
Mahadayi Water Dispute : आता तरी जागे व्हा!

नुकत्याच मिलेलेल्या माहितीनुसार, कोलवा पोलिसांनी एका रशियन नागरिकाकडून भारतात बंदी असलेल्या सिमकार्डसह सॅटेलाइट फोन जप्त केला आहे. हा रशियन नागरिक कोलवा येथील हॉटेलमध्ये राहत होता. पोलिसांनी त्याच्यावर इंडियन वायरलेस अँड टेलिग्राफ अॅक्ट आणि इंडियन टेलिग्राफी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, गोव्यातील सर्व हॉटेल्स पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यातील काहींनी पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेली आहे, तर काहींनी नोंदणीविना पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली आहे. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशाच्या विविध ठिकाणींवरुन पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

त्यामुळे पर्यटन खात्याने आदेश जारी करून पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केलेल्या सर्व हॉटेल्सनी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पर्यटकांची आकडेवारी सादर करण्याची अधिसूचना काढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com