Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दारूच्या नशेत 'रिव्हर्स'; पादचारी ठार, बेभान कार चालवणाऱ्या युवकास पणजी पोलिसांकडून अटक

Panjim: कार पाठीमागे घेताना चालकाचा ताबा सुटल्याने ती अचानक पदपथावर आली आणि एका पादचाऱ्याला धडकली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कार पाठीमागे घेताना चालकाचा ताबा सुटल्याने ती अचानक पदपथावर आली आणि एका पादचाऱ्याला धडकली. यात पादचारी गंभीर जखमी झाला होता. मंगळवारी घडलेल्या या घटनेतील जखमी मुकुट बोहरा (५०, आसाम) यांचे आज गोमेकॉत निधन झाले. याप्रकरणी, पोलिसानी कारचालकास अटक केली असून हा तो मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शाहिद अन्सारी (१८, रा. ताळगाव, मूळ नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो एका ‘स्पा’मध्ये कार्यरत असून, अपघाताच्या वेळी तो दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

फुटेजनुसार, अन्सारीने प्रथम पार्किंगमधील एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्याने अचानक गाडी वेगाने मागे घेतली आणि ती थेट पदपथावर चढवली.

त्याच वेळी चालत असलेल्या दोन पादचाऱ्यांपैकी एकाने जीव वाचवला; परंतु बोहरा यांना सुटता आले नाही. गाडीखाली चिरडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिथे कोणी नाही, तिथे संगीत आहे! हृदयाचे स्पंदन ते पावसाचे टप-टप... विश्वातील प्रत्येक गोष्टीत भरलेला आहे ताल!

Video: 'मुख्यमंत्री असावा तर असा!' रस्त्यावर जखमी महिलेला पाहून CM सावंतांनी ताफा थांबवला; 'स्वतःच्या गाडीतून' रुग्णालयात नेलं

गोव्याच्या राजकारणात विरोधकांची 'पाटीलकी'; युतीचे घोडे अडले, भाजपची रणनीती सुपरहिट! - संपादकीय

Dhurandhar Advance Booking: रणवीर सिंहचा 'धुरंधर' रिलीजपूर्वीच हिट? एक दिवस आधीच कमावले 5 कोटी

Goa ZP Election: 'युती काबार'? काँग्रेसच्या 'फसवणुकी'ला आरजीपीचे प्रत्युत्तर; जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

SCROLL FOR NEXT