Goa Winter Tourism: हिवाळ्यात खरा आनंद घ्यायचाय? गोव्यातील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण

Manish Jadhav

पाळोळे बीच

गोवा हे वर्षभर सुंदर असले तरी हिवाळ्यात भेट देण्यासाठी येथील वातावरण खूप आल्हाददायक असते. गोव्याच्या दक्षिण भागात असलेला पाळोळे बीच हा हिवाळ्यातील तुमच्या गोवा भेटीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.

Palolem Beach | Dainik Gomantak

मनमोहक चंद्रकोर आकार

पाळोळे बीचचा आकार अर्धचंद्राकृती असल्यामुळे येथील दृश्ये अत्यंत नयनरम्य असतात. एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंतचा पूर्ण किनारा स्पष्ट दिसतो.

Palolem Beach | Dainik Gomantak

शांत आणि सुरक्षित पाणी

हिवाळ्यात येथील समुद्राचे पाणी खूप शांत आणि उथळ असते. त्यामुळे कुटुंबासोबत आणि मुलांसाठी पोहण्यासाठी हा किनारा एकदम सुरक्षित आहे.

Palolem Beach | Dainik Gomantak

बोट राईड्स आणि डॉल्फिन

हिवाळ्यात सकाळच्या वेळी येथे डॉल्फिन दर्शन करण्यासाठी बोट राईड्स सहज उपलब्ध असतात. तसेच 'बटरफ्लाय बीच' साठी बोटीतून जाता येते.

Palolem Beach | Dainik Gomantak

शांतीचा अनुभव

उत्तर गोव्यातील किनाऱ्यांच्या तुलनेत पाळोळे बीच शांत आणि कमी गर्दीचा असतो. हिवाळ्यातील थंडीत येथे शांततेत वेळ घालवता येतो.

Palolem Beach | Dainik Gomantak

हट आणि कॉटेज निवास

या किनाऱ्यावर खास करुन हिवाळ्यात राहण्यासाठी लाकडी बीच हट्स आणि कॉटेज उपलब्ध होतात, ज्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळ राहण्याचा अनुभव मिळतो.

Palolem Beach | Dainik Gomantak

'सायलेंट डिस्को'

हिवाळ्यात येथील मनोरंजन खूप खास असते. पाळोळेमजवळ 'साऊंड ऑफ सायलेन्स' नावाचा सायलेंट डिस्को अनुभवायला मिळतो, जो गोव्यातील एक युनिक अनुभव आहे.

Palolem Beach | Dainik Gomantak

Carrot Juice Benefits: हिवाळ्यात दररोज प्या गाजराचा ज्यूस, शरीराला मिळतील जबरदस्त फायदे; जाणून घ्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आणखी बघा