Grampanchayat | Sarpanch Canva
गोवा

कोण होणार नवीन सरपंच? सत्तरी तालुक्यात पंचायतींना वेध; इच्छुकांच्या हालचालींना वेग

Panchayats In Sattari: काही सरपंचांनी आपल्या पदाचा आधीच राजीनामा दिला असून काहीजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यातील पंचायतींना सध्या नव्या सरपंचांचे वेध लागले आहेत. अलिखित करारानुसार अनेक सरपंचांचा कार्यकाळ संपला आहे. यापैकी काही सरपंचांनी आपल्या पदाचा आधीच राजीनामा दिला असून काहीजण राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

सत्तरी तालुक्यातील एकूण बारा पंचायतींपैकी पाच पंचायतीच्या सरपंचांचा दोन वर्षांचा कार्यकाळ अलिखित करारानुसार संपला आहे, त्यामुळे ते आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत म्हाऊसचे सरपंच सोमनाथ काळे आणि पर्येच्या सरपंच रती गावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंचायत संचालकांकडे सादर केला आहे‌. उर्वरित तीन सरपंच लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. त्या जागी नवीन सरपंचाची निवड होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी पंचायत निवडणुका झाल्यानंतर अनेक पंचायतींत सरपंच-उपसरपंच पद विभागून देण्याचा अलिखित करार झाला आहे. काही सरपंचांना एक वर्ष तर काहींना दोन वर्षांचा कार्यकाळ दिला होता. त्यापैकी ठाणेच्या सरिता गावकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदावर नीलेश परवार यांची वर्णी लावण्यात आली आहे. खोतोडाचे सरपंच नामदेव राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रोहिदास गावकर यांची सरपंचपदी निवड झाली. इतर काही सरपंचांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे.

वाढीव मुदत मिळावी यासाठी दबाव

दरम्यान, अलिखित करारानुसार कार्यकाळ संपलेल्या काही सरपंचांनी राजकीय बळाचा वापर करून आपल्याला वाढीव मुदत मिळावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मात्र या प्रयत्नांना अजून यश आलेले नाही. यासंदर्भात म्हाऊसच्या सरपंचपदावरून राजीनामा दिलेले सोमनाथ काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अलिखित करारानुसार आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी दोन वर्षांसाठी आपल्याला हे पद दिले होते. दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आपण पदाचा राजीनामा दिला आहे. दोन वर्षांच्या कार्यकाळात आपण विकासावर लक्ष केंद्रित केले. आरोग्यमंत्री व आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामांना चालना मिळाली. यापुढेही पंचायतीचा विकास पुढे नेण्यास आपले पूर्ण सहकार्य राहणार आहे.

म्हाऊसच्या सरपंचपदी सुलभा देसाईंची वर्णी शक्य

म्हाऊसचे सोमनाथ काळे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर म्हाऊस पंचायतीत नव्या सरपंचाची वर्णी लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार या पंचायतीच्या नवीन सरपंचपदी सुलभा देसाई यांची निवड होण्याची शक्यता आहे. नगरगावच्या सरपंच संध्या खाडीलकर, केरीच्या दीक्षा गावस व खोतोडाचे रोहिदास गावकर यांचा जागी नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच सावर्डेच्या सरपंच उज्ज्वला गांवकर या राजीनामा देणार असल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT