Election campaigning Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election: काणकोणात प्रचार शिगेला

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी उमेदवारांनी बांधली पायाला भिंगरी

दैनिक गोमन्तक

आगोंद: काणकोण तालुक्यातील सात पंचायतींच्या निवडणुकीसाठी आज रविवारी सर्व प्रभागांतील उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडविला. मतदारांच्‍या घरी जाऊन त्‍यांच्‍या गाठीभेटी घेण्‍याबरोबरच आपल्‍यालाच मतदान करा, असे सांगायला ते विसरले नाहीत.

( Panchayat election campaigning at Canacona incresed)

तालुक्यातील सात पंचायतींच्‍या 56 प्रभागांतून 172 उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत. 3 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. राज्‍यात भाजपची सत्ता असल्‍याने या पक्षाने समर्थन दिलेल्‍या उमेदवारांचे पारडे जड असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. पैंगीण, गावडोंगरी व श्रीस्थळ येथून प्रत्येकी 1 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेला आहे.

आगोंद : या पंचायतीत एकूण 7 प्रभाग आहेत. प्रभाग 1 मधून 4 उमेदवार, प्रभाग 2 मधून 3, प्रभाग 3 मधून 4, प्रभाग 4 मधून 2, प्रभाग 5 मधून 3 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. माजी सरपंच बादल नाईक गावकर विरूद्ध भाजपने समर्थन दिलेल्‍या उमेदवार फातिमा यांच्यामध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे. प्रभाग 6 व प्रभाग 7 मधून प्रत्‍येकी 2 असे एकूण 2० उमेदवार रिंगणात आहेत. काही मोजकेच प्रभाग सोडल्यास प्रत्येक ठिकाणी तिरंगी, चौरंगी, पंचरंगीसुद्धा लढती होणार आहेत.

खोला : या पंचायतीमधून सर्वाधिक 3० उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. प्रभाग 1 मधून 3, 2 मधून 4, 3 मधून 3, 4 मधून 4, प्रभाग पाचमधून 2, 6 मधून 4, प्रभाग 7 मधून 3, प्रभाग आठमधून 2 प्रभाग 9 मधून 4 उमेदवार रिंगणात आहेत.

खोतीगाव : या पंचायतीत 7 प्रभाग आहेत. प्रभाग 1 मधून 2, प्रभाग 2 मधून 2, प्रभाग 3 मधून 3, प्रभाग 4 मधून 3, प्रभाग 5 मधून 4, प्रभाग 6 मधून 3, प्रभाग 7 मधून 4 असे एकूण 2० उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

श्रीस्थळ : एकूण 9 प्रभाग आहेत. प्रभाग 1 मधून 3, प्रभाग 2 मधून 2, प्रभाग 3 मधून 5, प्रभाग 4 मधून 5, प्रभाग 5 मधून राजेश वेळीप यांची बिनविरोध निवड झाली आहे, प्रभाग 6 मधून 3, प्रभाग 7 मधून 2 उमेदवार, प्रभाग 8 मधून 3, प्रभाग 9 मधून 3 असे एकूण 27 उमेदवार रिंगणात आहेत.

पैंगीण : एकूण 9 प्रभाग असून प्रभाग 1 मधून 3, प्रभाग 2 मधून 2, प्रभाग 3 मधून 4, प्रभाग 4 मधून सुनील पैंगीणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग 5 मधून 2, प्रभाग 6 मधून 3, प्रभाग 7 मधून 4, प्रभाग 8 मधून 3 तर प्रभाग 9 मधून 3 असे एकूण एकूण 29 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

लोलये-पोळे : एकूण 9 प्रभाग असून 1 मधून 2, प्रभाग 2 मधून 2, प्रभाग 3 मधून 4, प्रभाग 4 मधून 2, प्रभाग 5 मधून 3, प्रभाग 6 मधून 5, प्रभाग 7 मधून 2, प्रभाग 8 मधून 4 तर नऊ मधून 5 असे 29 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत.

गावडोंगरी : एकूण 9 प्रभाग असून एकूण 21 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. प्रभाग 1 मधून 2, प्रभाग 2 मधून 4, प्रभाग 3 मधून 2, प्रभाग 4 मधून 2, प्रभाग 5 मधून यशवंत देसाई यांची बिनविरोध निवड झालेली आहे. प्रभाग 6 मधून 2, प्रभाग 7 मधून 2, प्रभाग 8 मधून 3, प्रभाग 4 मधून 3 उमेदवार रिंगणात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT