डिचोली: संघटित कार्यावरच यश अवलंबून असते. डिचोली गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी काढले. पदाधिकाऱ्यांनी यापुढेही मंडळाच्या उत्कर्षासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
(MLA Chandrakant Shetye appreciated the Ganeshotsav mandals in Bicholim)
डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने चतुर्थीनिमित्त काढलेल्या देणगी कुपनांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. गणपती पूजन मंडपात अलीकडेच आयोजित केलेल्या या कार्यक्रमास यावेळी त्यांच्यासमवेत माजी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेविका ॲड. अपर्णा फोगेरी, मंडळाचे अध्यक्ष दत्तगुरू आमोणकर, प्रदीप तिरोडकर, शिवराम फळारी आणि लॉटरी प्रमुख प्रशांत धारगळकर उपस्थित होते.
राजेश पाटणेकर यांनी मंडळाच्या कार्याची स्तुती केली. कुंदन फळारी यांचेही भाषण झाले. स्वागत दत्तगुरू आमोणकर यांनी केले.नरेश कडकडे यांनी सूत्रसंचालन केले, तर शिवराम फळारी यांनी आभार मानले.
''राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या''
वास्को: प्लास्टिक ध्वजाचा उपयोग करू नये. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासंबंधी दक्षता घ्यावी, असे आवाहन रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी केले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' संबंधी जागृती करण्यासाठी रवींद्र भवन बायणा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
13 ते 15 ऑगस्ट पर्यंत घरांवर फडकविण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजासंबंधी कोणती खबरदारी घेण्यात यावी, यासंबंधी माहिती देण्यात आली. भारतीय तटरक्षक दल गोवा मुख्यालयाने रवींद्र भवन बायणा, मुरगाव उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालय यांच्या सहकार्याने 'हर घर तिरंगा' जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.