पणजी येथील गौरीश धोंड (Gaurish Dhond) यांना भारतीय रेडक्रॉस सोसायटीचा (Indian Red Cross society for 2020-21) वर्ष 2020-21 साठीचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे. गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई (P S Sreedharan Pilla) यांच्या हस्ते बुधवारी धोंड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रेडक्रॉस सोसायटीच्या अंतर्गत समितीने केलेले नामांकन आणि पुरस्कार समितीच्या शिफारशींवरून हा पुरस्कार देण्यात आला आहे. रेडक्रॉसच्या मानवतावादी कार्य आणि सेवा यासाठी गौरीश यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. धोंड हे गोवा राज्य भारतीय रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष आहेत.
गौरीश धोंड मागील दोन दशकांहून अधिक काळ रेडक्रॉसच्या सेवेत आहेत. 2020-21 या वर्षासाठी त्यांना सुवर्णपदक जाहीर करण्यात आले. राजभवन येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे धोंड हे गोव्यातील पहिले नागरिक आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.