Goa Police: 'त्या' एका गोष्टीची खंत; DGP म्हणाले 2023 मध्ये पोलिसांसमोर 'ही' आहेत आव्हाने

किनारपट्टी पोलिसिंगसाठी किमान दोन बोटी यावर्षी खरेदी करण्याचे जसपाल सिंग यांनी यावेळी सांगितले.
DGP Jaspal Singh
DGP Jaspal Singh Dainik Gomantak

Goa Police: गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी वर्षे 2022 मधील राज्यातील पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला. जसपाल सिंग यांनी वर्षभरातील पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत पोलिसांचे कौतुक केले. पण, त्याचवेळी राज्यातील अपघातावर नियंत्रण मिळवता आले नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.

तसेच, वाहन चालक परवाना देण्याचे अधिकार पोलिस खात्याकडे नसल्याने अपघातावर नियंत्रण मिळवणे कठीण जात असल्याचे सिंग यांनी नमूद केले. किनारपट्टी पोलिसिंगसाठी किमान दोन बोटी यावर्षी खरेदी करण्याचे जसपाल सिंग (DGP Jaspal Singh) यांनी यावेळी सांगितले.

DGP Jaspal Singh
Anjuna Crime: मद्यधुंद बिहारींच्‍या मारहाणीतील जखमीचा गोमेकॉत मृत्‍यू

"रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवता आले नाही याबद्दल मला खंत वाटते, रस्ते सुरक्षा हा सर्वांसाठी महत्वाचा विषय आहे. यात वाहतूक विभाग, बांधकाम विभाग, महापालिका आणि पंचायत यांची देखील भूमिका महत्वाची आहे.

चालक परवाना देताना सक्त नियमांची अंमलबजावणी करणे हाच रस्ते सुरक्षा सुनिश्चित करण्याचा एकमेव पर्याय आहे. मात्र, चालक परवाना देणे पोलिसांच्या हातात नाही. यावर्षी पोलिसांसमोर रस्ते अपघातांवर नियंत्रण हे एक मोठे आव्हान असणार आहे.

याशिवाय अमली पदार्थ तस्करी, तापासाचा वेग वाढवणे आणि केस लांबणीवर पडणार नाहीत याची काळजी घेणे ही ध्येय 2023 मध्ये पोलिसांसमोर आहेत." असे जसपाल सिंग म्हणाले.

DGP Jaspal Singh
Calangute : पुण्याच्या पर्यटकासोबत गोव्यात घडले असे काही, शेवटी मदतीला पोलिस आले धावून

"आर्थिक गुन्हे शाखा, किनारपट्टी सुरक्षा पथक, सुरक्षा आणि प्रशिक्षण ही पोलिस खात्याची महत्वाची अंग आहेत. आणि देशाच्या सुरक्षेसाठी देखील या शाखा महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही यंत्राणा खरेदी करण्याची नितांत गरज आहे. किनारपट्टी सुरक्षेसाठी यावर्षी किमान दोन बोट खरेदी कराव्याच लागतील." असे सिंग म्हणाले.

पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारींना प्राथमिकता द्यायला हवी असे जसपाल सिंग यांनी यावेळी पोलिसांना सांगितले. "5G तंत्रज्ञानामुळे आगामी काळात अमली पदार्थ आणि सायबर शाखेपुढे अनेक आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आपण देखील आपली कौशल्ये आणि क्षमता वाढवणे गरजेचे आहे." असे सिंग म्हणाले. पोलिस महासंचालकांनी यावेळी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात केलेल्या कारवाईचे देखील कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com