Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City : ''एवढे' कोटी रूपये खर्चूनही ‘स्मार्ट पणजी'त अनागोंदी

‘कॅग’ने ताशेरे ओढूनही सुधारणा नाहीच

गोमन्तक डिजिटल टीम

एल्विस गोम्स

Panaji Smart City : पणजी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांत अनियमितता असून अनागोंदीचा कारभार झाल्याचा ठपका आहे.शिवाय अधिकाऱ्यांच्या पगारावर कोट्यवधींचा खर्च आत्तापर्यंत झाला आहे. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) अंतर्गत ११०० कोटींवर खर्च झाल्याचे म्हटले जात असून, या कामांची सखोल तपासणी व्हावी,अशी मागणी काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी केली.

विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या कामांवर अनेकदा प्रश्‍न उपस्थित केले आहेत, आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात या कामांविषयी सत्यता बाहेर येणारा अहवाल यावा, किंवा विऱोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारायलाच हवा,अशी पणजीवासीयांची अपेक्षा आहे.

आयपीएससीडीएलचे तत्कालीन सीईओ स्वयंदीप्त पाल चौधरी आणि एमडीवर आयपीएससीडीएलने लाखो रुपये पगारापोटी खर्च केले. माजी सनदी अधिकारी काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स स्मार्ट सिटीतील घोटाळ्यावर सतत आवाज उठवला आहे.

‘कॅग’ने ताशेरे ओढूनही सुधारणा नाहीच !

आयपीएससीडीएलची कार्यपद्धती इतकी धाडसी मानली पाहिजे की, महालेखापालाने कंपनीच्या बेशिस्त वर्तनाविषयी नोटीस देऊनही त्यांच्या कामात काहीही दुरुस्ती झाली नाही.

विशेष बाब म्हणजे ‘कॅग’ने आपल्या अहवालात ताशेरे ओढताना २०१७-१९ ते २०२०-२१ च्या आपला व्यवहाराचा अहवालच सादर केला नाही.

तत्पूर्वी ‘कॅग’ने २०१६ ते २०१९ या काळात आयपीएससीडीएलच्या कामाच्यावेळी स्वयंदिप्त पाल चौधरी यांच्या सीईओ म्हणून केलेल्या नियुक्तीवर प्रश्‍न उपस्थित केले होते.

आरोपांवर आम्ही ठाम

स्मार्ट सिटीच्या कामाबाबत कॉंग्रेसने आत्तापर्यंत अनेक प्रश उपस्थित केले आहेत. या प्रश्‍नी केलेल्या आरोपांवर आम्ही ठाम आहे.

या भ्रष्टाचाराविषयी आम्ही दक्षता आयोगाकडे तक्रारही केली आहे. याशिवाय स्मार्ट सिटीच्या कार्यालयावर मोर्चाही नेला होता. कॉंग्रेसचे आमदार स्मार्ट सिटीच्या कामावर वारंवार प्रतिक्रिया व्यक्त करत आले आहेत. विधानसभेतही या प्रश्‍नावर पडसाद उमटतील,अशी अपेक्षा आहे.

मलनिस्सारण, स्मार्ट रस्त्यांचाही मुद्दा महत्त्वाचा

आयपीएससीडीएलने आलेली खर्चातील रक्कम शहरातील पार्किंग आराखडा तयार करण्यासाठी दिल्लीच्या एका कंपनीला २८ लाख रुपये मोजले होते.

अशाप्रकारे त्याशिवाय मूलभूत सुविधा अगोदर करण्यापूर्वी शहरात सुशोभिकरणाच्या कामावर आयपीएससीडीएलने लक्ष केंद्रीत केल्याने त्यावर टीका झाली.

त्याशिवाय स्मार्ट सिटी मंडळावर पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि महापौर रोहित मोन्सेरात आहेत. त्यांच्या काळात काही अपप्रकार झाल्याने त्यावर चौफेर टीकाही झाली होती.

त्याशिवाय स्मार्ट सिटीच्या मागील वर्षी सुरू झालेल्या मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे आणि स्मार्ट रस्ते करण्याचे काम सुरू झाले, हे काम वादाचा विषय ठरला आहे. हा विषय विधानसभेत विरोधक किती धसास लावतात, हे पहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT